‘अफगाणिस्तान महिलांसाठी असुरक्षित; त्यांनी कामावर जाऊ नये’

तालिबान नेत्यांनी महिलांचे हक्क मागे घेतले जाणार नाहीत याची हमी देण्यास नकार दिला आहे.

women

सध्याच्या परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये महिला सुरक्षित नाहीत, असं तालिबानने मान्य केलंय. तसेच सध्या महिलांनी कामावर जाऊ नये, शक्य असेल त्यांनी घरूनच काम करावे असं तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत म्हटलंय. महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पडू नये. तसेच आधीच्या तालिबान राजवटीच्या तुलनेत यावेळी महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार दिले जातील, असं तालिबानने म्हटलंय. तालिबानी हे सतत बदलत असतात तसेच त्यांना योग्य प्रशिक्षण नसतं त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, असंही म्हटलंय.

१९९६ ते २००१ च्या दरम्यान सत्तेत असताना तालिबानने महिलांना कामाच्या ठिकाणी बंदी घातली होती. तसेच त्यांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला होता आणि बुरखा घालणं बंधनकारक केलं होतं.

जागतिक बँकेने अफगाणिस्तानमधील निधी थांबवल्यानंतर, महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करून आणि तालिबानच्या ताब्यात आल्यापासून मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या अहवालांची “पारदर्शक आणि त्वरित चौकशी” करण्याची मागणी केल्याच्या काही तासांच्या आतच तालिबानकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. कारण अफगाणिस्थानची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात परकीय मदतीवर आहे.

दरम्यान, तालिबानने आश्वासन दिलंय की ही नवीन सुरुवात आहे. परंतु तालिबान नेत्यांनी महिलांचे हक्क मागे घेतले जाणार नाहीत याची हमी देण्यास नकार दिला आहे. आणि अनेक महिलांना आधीच हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे.

गेल्या २४  तासांमध्ये एकूण १९ हजार निर्वासितांनी अफगाणिस्तान सोडले आहे, असं पेंटागॉनने बुधवारी जाहीर केलंय. ११ हजार २०० जणांना ४२ अमेरिकन लष्करी विमानांद्वारे बाहेर काढण्यात आले तर इतर देशांनी भागिदारी करून ७ हजार ८०० नागरिकांना बाहेर काढले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Afghan women should not go to work for their safety says taliban spokesman hrc

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या