Afghanistan Crises : काबुलमधील आर्मी हॉस्पिटलजवळ स्फोट; १९ जणांचा मृत्यू

ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून काबूलमध्ये सातत्याने स्फोट होत आहेत. 

Kabul-Blast
काबूलमध्ये स्फोट आणि गोळीबाराच्या आवाजाने लोक हादरले (file photo ap)

काबूलमध्ये स्फोट आणि गोळीबाराच्या आवाजाने लोक हादरले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, लष्करी रुग्णालयाजवळ दोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. यादरम्यान लोकांना गोळीबाराचा आवाज आला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मंगळवारी अफगाणिस्तानच्या राजधानीतील लष्करी रुग्णालयाबाहेर स्फोटाचा आवाज ऐकू आला. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला तर ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे.

अफगाणिस्तानच्या टोलोन्यूजने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टोलोन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार काबूल शहरातील पोलीस जिल्हा १० मध्ये आज दोन स्फोट झाले. पहिला स्फोट सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयासमोर झाला. दुसरा स्फोटही रुग्णालयाजवळच्या परिसरात झाला. स्फोट क्षेत्रातून गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. राजधानीत झालेल्या स्फोटाबाबत तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून काबूलमध्ये सातत्याने स्फोट होत आहेत. याआधी २६ ऑगस्टला काबूल विमानतळावर भीषण स्फोट झाला होता. त्यावेळी अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा असल्यापासून देश सोडून जाणारे लोक मोठ्या संख्येने काबूल विमानतळावर होते. या  स्फोटात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर १५० हून अधिक लोक जखमी झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Afghanistan crises explosion near a military hospital in kabul srk

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या