अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर अस्थिरतेचं वातावरण आहे. तालिबाननं हंगामी सरकार स्थापन केल्यानंतरही अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवाया सुरुच आहेत. आता तालिबानसोबत काही दहशतवादी संघटनांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाहनांना लक्ष्य केलं आहे. सिरिअल बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या आमक न्यूज एजन्सीवर याबाबतचं वृत्त प्रकाशित करत ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तालिबाननं जे पेरलं ते उगवत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भविष्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यात तालिबानी दहशतवाद्यांसह आठ जण ठार झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन सैनिक ३० ऑगस्टला अफगाणिस्तानातून मायदेशी परतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यानंतर तालिबाननं हंगामी सरकार स्थापन केलं. मात्र असं असलं तरी तालिबानसमोर आर्थिक आणि सुरक्षेचं मोठं आव्हान आहे. त्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या वाढत्या कारवाया पाहता चिंता वाढली आहे. अमेरिकन सैनिकांनी माघार घेण्यापूर्वी तालिबान आणि इस्लामिक स्टेट एकमेकांचे कट्टर शत्रू होते. दोन्ही संघटना इस्लाम विचारधारेशी प्रेरित आहेत. मात्र तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यावर लक्ष केंद्रीत केलं. तर इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानसह इतर ठिकाणी जागतिक जिहादचं आवाहन करते. अमेरिकन सैनिक मायदेशी जात असताना विमानतळावर हल्ले झाले होते. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट असल्याचं सांगण्यात आलं होतं.

रस्ते अपघातामध्ये रोज ३२८ भारतीय गमावतात प्राण; पाहा धक्कादायक आकडेवारी

दुसरीकडे, अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर परदेशी मदत गोठवली गेली आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने कर्ज थांबवले. अमेरिकेने देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे 9.4 अब्ज डॉलर्सचा साठा थांबवला. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) आपल्या ३९ सदस्य राष्ट्रांना तालिबानची संपत्ती ब्लॉक करण्यास सांगितले. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ढासळली आहे आणि किंमती वाढत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने या आठवड्यात सावध केले की अफगाणिस्तानची ९७ टक्के लोकसंख्या लवकरच दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan crisis islamic state attack on taliban rmt
First published on: 20-09-2021 at 22:06 IST