Afghanistan Crisis: काबूल एअरपोर्टवर पाण्याची बाटली ३ हजार रुपये!

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीची तारीख जसजशी जवळ येत आहे. तशी तिथे अडकलेल्या लोकांच्या चिंतेत वाढ होतं आहे.

Afghanistan-Crisis
Afghanistan Crisis: काबूल एअरपोर्टवर पाण्याची बाटली ३ हजार रुपये! (Photo- Reuters)

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या सत्तेनंतर स्थिती बिकट होत चालली आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीची तारीख जसजशी जवळ येत आहे. तशी तिथे अडकलेल्या लोकांच्या चिंतेत वाढ होतं आहे. काबूल विमानतळावर गोंधळाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसात महागाई उच्चांक गाठत असल्याचं चित्र आहे. खाण्यापिण्याचं वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडल्याचं चित्र आहे. काबुल एअरपोर्टवर पाण्याच्या एका बाटलीसाठी ४० डॉलर्स म्हणजेच ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. तर एक प्लेट राइससाठी १०० डॉलर्स म्हणजे जवळपास साडे सात हजार द्यावे लागत आहेत. विशेष म्हणजे विमानतळावर यासाठीचे पैसे डॉलर्समध्येच घेतले जात आहेत. महागाईमुळे अफगाणिस्तानातील सर्वसामान्य जनतेचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अफगाणिस्तानातील चलनाचे मूल्य काय?

अफगाणिस्तानात नागरिक चलनाला अफगाणी म्हणतात. सध्या अफगाणिस्ताना एका डॉलर्सची किंमत ८६ अफगाणी आहे. भारतीय १ रुपयासाठी १.१६ अफगामी मिळतात. म्हणजेच भारतीय चलनाचे मूल्य १६ पैसे अधिक आहे.

देशातील नव्या एफडीआय नियमांना कंटाळून Yahoo चा मोठा निर्णय

तालिबाननं काबूल विमानतळाला चारही बाजूने घेराव घातला आहे. तालिबानने सर्व ठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी विमानतळावर होत आहे. तिथेही तालिबान समर्थक नागरिकांना त्रास देत आहेत. वर्ल्ड फूड प्रोग्रामने जारी केलेल्या अहवालानुसार अफगाणिस्तानातील स्थिती गंभीर असल्याचं दिसत आहे. तीन पैकी एक अफगाणी नागरिक उपाशी असल्याचं या अहवाला नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच १.४ कोटी नागरिकांची उपासमार होत आहे. यात २० लाख मुलं कुपोषणाने ग्रस्त आहेत. त्यांना मदतीची गरज असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सध्या अफगाणिस्तान पिकं नाहीत, पाऊस नाही, पिण्याचं पाणी नाही यामुळे तिथलं संकट आणखी गहिरं होत चाललं आहे.

खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की, लोकांना उपाशी पोटी विमानतळावर रहावं लागत आहे. अनेक जण चक्कर येऊन पडत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र तालिबान लोकांची मदत करण्याऐवजी त्यांच्यासोबत मारहाण करत आहेत. दुसरीकडे अमेरिका आणि नाटो देशाचे सैनिक अफगाणिस्तानातील नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. लोकांना पाण्याच्या बाटल्या आणि जेवण उपलब्ध करून देत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Afghanistan crisis kabul airport water bottle price 3 thousand rupees rmt

ताज्या बातम्या