१५ ऑगस्ट रोजी तालिबानींनी काबूल विमानतळावर ताबा मिळवला आणि संपूर्ण अफगाणिस्तानवर अंमल प्रस्थापित झाल्याचं जाहीर केलं. त्यामुळे संपूर्ण जगालाच चिंता आणि भिती वाटू लागली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केल्यापासून तेथील परिस्थिती आतापर्यंत सामान्य झालेली नाही. तेथील नागरिक अजूनही भीतीच्या वातावरणात जगत आहेत. तर अनेक देश अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या त्यांच्या नागरिकांबद्दल चिंतित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनने सोमवारी आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हॉटेल्सपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये विशेषत: प्रसिद्ध सेरेना हॉटेलचा उल्लेख आहे. त्यामुळे जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. हा इशारा देण्यामागे काय कारण असेल याचे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. 

‘सबका साथ’साठी तालिबान तयार, पण…” तालिबानी नेत्यानं स्पष्ट केली भूमिका!

“सेरेना हॉटेलमध्ये किंवा त्याच्या जवळ असलेल्या अमेरिकन नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव या भागातून त्वरित बाहेर पडावे.”, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिला आहे. ब्रिटन स्टेट डिपार्टमेंटने अफगाणिस्तानला प्रवास न करण्याच्या आपल्या सल्ल्याच्या अपडेटमध्ये म्हटले आहे, “वाढत्या जोखमीमुळे तुम्हाला (नागरिकांना) हॉटेलांपासून (विशेषतः काबूलमधील सेरेना हॉटेल) दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.”

“आमची राजवट अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा…”; तालिबानचा अमेरिकेला इशारा

सेरेना हॉटेल हे काबुलचे सर्वात प्रसिद्ध आलिशान हॉटेल आहे, जे आठ आठवड्यांपूर्वी तालिबानने काबूल ताब्यात घेण्यापूर्वी परदेशी लोकांची पहिली पसंती होती. हे दोनदा अतिरेकी हल्ल्यांचे लक्ष्य बनले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan crisis those at serena hotel kabul should leave immediately us uk warn srk
First published on: 11-10-2021 at 13:26 IST