scorecardresearch

अफगाणिस्तानने भारतातला दूतावास केला बंद, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

इस्लामिक रिपब्लिकन ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासाने रविवारपासून (१ ऑक्टोबर) भारतातील संपूर्ण कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Afghanistan Embassy in India
हा दूतावास स्थलांतरित होईपर्यंत भारतातील वाणिज्य सेवा सुरू राहतील असं अफगाणिस्तानने स्पष्ट केलं आहे. (PC : Indian Express)

भारताचा शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानने आजपासून भारतातील त्यांचा दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. इथल्या सरकारकडून आणि मुत्सद्द्यांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचं अफगाणिस्तानच्या दूतावासाने स्पष्ट केलं आहे. इस्लामिक रिपब्लिकन ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासाने रविवार, १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतातील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. या निवेदनात दूतावासाने म्हटलं आहे की नवी दिल्लीतल्या अफगाणिस्तानच्या दूतावासाने आजपासून भारतातलं आमचं कामकाज बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना आम्हाला खूप निराशा, दुःख आणि खेद वाटतोय.

खरंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचं राज्य आल्यानंतरही तिथल्या आधीच्या सरकारचा भारतातील दूतावास सुरू होता. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर भारतातला त्यांचा अधिकृत राजदूत कोण यावरून अलिकडेच मोठा गदारोळ झाला होता. अशातच आता अफगाणिस्तानने आजपासून भारतातील त्यांचा दूतावास बंद केला आहे. यजमान सरकारकडून आम्हाला पुरेसा पाठिंबा मिळत नाहीये, त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या हितांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यजमान सरकारला अपयश आलं असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं दूतावासाने म्हटलं आहे.

World Cup 2023 Updates
VIDEO: ‘भारतातील ‘या’ दोन शहरात पाकिस्तान संघाला मिळणार जास्त पाठिंबा’; माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदचं मोठं वक्तव्य
india rejects justin trudeau allegations
खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचे प्रकरण : ट्रुडोंचा पुराव्यांचा दावा भारताला अमान्य
indian visa service to canada
Indians in Canada: भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा थांबवली; हरदीप निज्जर हत्या प्रकरणातील आरोपांनंतर मोठा निर्णय!
indians in canada hindu sikh
Indians in Canada: “कॅनडातील हिंदू दहशतीच्या छायेखाली”, भारतावरील आरोपांनंतर कॅनडाच्या खासदाराचा दावा; म्हणाले, “खलिस्तानी…”

अफगाणिस्तानने निवेदनात म्हटलं आहे की भारताबरोबरचे आमचे ऐतिहासिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील वेगवेगळ्या भागीदाऱ्या पाहता हा निर्णय क्लेशदायक असला तरी आम्ही तो खूप काळजीपूर्वक आणि योग्य विचारविनिमय करून घेतला आहे. एकीकडे भारताकडून आम्हाला पुरेसं समर्थन मिळत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला काबूलमध्ये वैध सरकारही नाही. त्यामुळेच आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत.

हे ही वाचा >> सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या Aditya-L1 बाबत मोठी अपडेट, ISRO चा दुसऱ्यांदा मोठा पराक्रम, एका महिन्यात ‘इतकं’ अंतर पार

दरम्यान, दूतावास स्थलांतरित होईपर्यंत दूतावासाच्या भारतातील वाणिज्य सेवा सुरू राहतील असंही दूतावासाने स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तानी दूतावासातील राजदूत आणि इतर अधिकाऱ्यांनी भारत सोडून युरोप आणि अमेरिकेत आश्रय घेतला आहे. पाच अधिकाऱ्यांनी नुकताच देश सोडला. तसेच नवी दिल्लीतलं कामकाज थांबवण्याबद्दल दूतावासाने आधीच भारत सरकारला कळवलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Afghanistan embassy in new delhi shuts down reasoning lack of diplomatic support from india asc

First published on: 01-10-2023 at 09:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×