तालिबानच्या सशस्त्र बंडखोरांनी काबूलमध्ये प्रवेश करत अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून अबु धाबीमध्ये आश्रय घेतला. काबूलमधील सर्व सरकारी इमारतींवर तालिबान्यांनी आपला सत्ता प्रस्थापित केली. पण अफगाणिस्तानच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी तालिबानचं सरकार कसं असेल, या चिंतेत असणाऱ्या जगाला अमरुल्लाह सालेह यांनी मी देशाचा काळजीवाहू अध्यक्ष आहे असं सांगितलं होतं. आता सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानवर तीव्र टीका केली आहे.

अमरुल्ला सालेह यांनी पाकिस्तानने तालिबानला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर कधीही तालिबानपुढे झुकणार नाही असे अमरुल्ला सालेह यांनी म्हटले आहे. अमरुल्लाह सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबानच्या जोडीविरुद्ध उभे राहणार असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानातून पळून जाण्याऐवजी पंजशीर खोऱ्यात आपला तळ बनवणाऱ्या अमरुल्ला सालेहने सांगितले की, पाकिस्तानसाठी अफगाणिस्तान इतका मोठा आहे की ते आपला देश गिळू शकत नाही. सालेह यांनी तालिबानी दहशतवाद्यांना जोरदार लक्ष्य केले आहे.

“देशांनी कायद्याच्या राज्याचा आदर केला पाहिजे, हिंसाचाराचा नाही. अफगाणिस्तान पाकिस्तानसाठी इतका मोठा आहे की तो गिळू शकत नाही. तसेच तालिबानसाठीही तो इतका मोठा आहे, ते त्यावर राज्य करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या इतिहासात असा धडा येऊ देऊ नका ज्यात दहशतवाद्यांपुढे तुम्हाला झुकावं लागलं किंवा अपमानाचा उल्लेख असेल,” असे सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अशरफ घनी देश सोडून पळून गेल्यानंतर अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित केले आहे. सालेह यांनी उत्तर आघाडीसारख्या अफगाण नागरिकांना तालिबानच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. अमरूल्लाह सालेह यांनी ट्विट यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. “अफगाणिस्तानच्या राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थिती, पलायन, राजीनामा किंवा मृत्यूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत FVP अर्थात First Vice President देशाचा काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष होतो. मी अजून माझ्या देशातच आहे. आणि मी देशाचा कायदेशीररीत्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहे. मी सर्व नेत्यांशी चर्चा करून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे”, असं अमरुल्लाह सालेह यांनी होतं.

आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी अमेरिकेला लक्ष्य केले होते. आता जो बायडेन यांच्याशी अफगाणिस्तानवर वाद घालणे व्यर्थ आहे. आपल्याला अफगाणिस्तानांना हे सिद्ध करावे लागेल की अफगाणिस्तान व्हिएतनाम नाही आणि तालिबान हे व्हिएतनामी कम्युनिस्टांसारखे दूरस्थही नाहीत, असे म्हटले होते.