scorecardresearch

अफगाणिस्तानमधील परिस्थिती हाताबाहेर… भारताने आपल्या नागरिकांना परत बोलावलं

तालिबानशी तीव्र लढाई दरम्यान भारताने आज आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले आहे

अफगाणिस्तानमधील परिस्थिती हाताबाहेर… भारताने आपल्या नागरिकांना परत बोलावलं
तालिबानने आतापर्यंत सहा प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत (AP Photo/File)

तालिबानशी तीव्र लढाई दरम्यान भारताने आज आपल्या नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले आहे. तालिबानने आतापर्यंत सहा प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, भारत सरकारने अफगाणिस्तानचे चौथे मोठे शहर मजार-ए-शरीफ येथून आपले मुत्सद्दी आणि नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात आज (मंगळवार) संध्याकाळी अफगाणिस्तानातील उत्तर शहर मजार-ए-शरीफ येथून एक विशेष विमान नवी दिल्लीला रवाना होणार आहे.

अफगाणिस्तानच्या बल्ख आणि तखार प्रांतात तालिबान लढाऊ आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये तीव्र लढाई दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. तालिबानने अलीकडेच उत्तर बल्खचे अनेक भाग काबीज केले. आता त्यांचे लक्ष्य मजार-ए-शरीफ आहे. मजार-ए-शरीफ बाल्ख प्रांताची राजधानी आणि अफगाणिस्तानमधील चौथे मोठे शहर आहे.

ज्या भारतीय नागरिकांना विशेष उड्डाणाने जायचे आहे त्यांनी त्यांचे पूर्ण नाव आणि पासपोर्ट नंबर सारखे तपशील तातडीने वाणिज्य दूतावासात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार सुमारे १५०० भारतीय सध्या अफगाणिस्तानमध्ये राहतात. गेल्या महिन्यात भारताने कंधारमधील आपल्या दूतावासातून सुमारे ५० राजनैतिक अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना परत बोलावले होते.

मे मध्ये, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने ऑगस्टच्या अखेरीस अफगाणिस्तानातून संपूर्ण माघार घेण्याचा टप्पा सुरू केला. याआधी अमेरिकेने सांगितले होते की, अफगाणिस्तानातून सैन्यांची संपूर्ण माघार ११ सप्टेंबरपर्यंत केली जाईल. त्यानंतर अमेरिकेने सांगितले की ३१ ऑगस्ट रोजी सर्व सैनिक परत येतील.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-08-2021 at 16:52 IST

संबंधित बातम्या