scorecardresearch

श्रद्धा वालकरचा मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी आफताबने मागवला होता ११ किलो बर्फ, पोलिसांनी दिली माहिती

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये विविध धक्कादायक दावे

Sharaddha Walkar
काय म्हटलं आहे दिल्ली पोलिसांनी?

Shraddha Walkar Murder: १८ मार्च २०२२ ला आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची हत्या केली. त्याआधी आफताबने श्रद्धाच्या अकाऊंटमधून आफताबने स्वतःच्या अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर १९ मे रोजी २५० रूपये ट्रान्सफर केले. ७ जून २०२२ ला ६ हजार रुपये ट्रान्सफर केले. एवढंच नाही तर श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी आफताबने ११ किलो ड्राय आईस मागवला होता. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे त्यानुसार श्रद्धाची लिपस्टिक, मोबाइल फोन, क्रेडिट आणि डेबिट कार्ड हे सगळं भाईंदरच्या खाडीमध्ये फेकलं. त्याला खाडीचा कुठला भाग खोल आहे हे माहित होतं तिथे जाऊन त्याने या सगळ्या वस्तू फेकल्या. तसंच करवत, चाकू आणि चायनीज चॉपर हे सगळं त्याने एम.जी. रोडच्या झाडींमध्ये फेकलं होतं. पोलिसांना अद्याप हे मिळालं नाही. आफताबचा एक चाकू, हातोडी आणि कात्री हे सगळं फ्लॅटमध्येच ठेवलं होतं

श्रद्धा आणि आफताबचं काऊन्सिलिंग सेशन

मुंबईत झालेल्या भांडणानंतर श्रद्धा आणि आफताब या दोघांनीही Dr. Practi app वर एक काऊन्सलिंग सेशन घेतलं होतं. याचा व्हिडिओ आणि ऑडिओही दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. आयपी लॉग्ज, जीपीएस लोकेशन आणि बंबल अॅप यातल्या डेटातल्या माहितीवरून हेदेखील समोर आलं आहे की श्रद्धाचा मोबाईल तिच्या मृत्यूनंतर दोन दिवस सक्रिय होता. त्याचं लोकेशन दिल्लीतला फ्लॅटच होता.

आफताबने २०२१ मध्ये ऑनलाइन मागवल्या होत्या वस्तू

आफताबने २०२१ मध्ये काही वस्तू ऑनलाइन मागवल्या होत्या. ज्यामध्ये दोन अंगठ्यांचा समावेश होता. या दोन पैकी एक अंगठी त्याने त्याच्या बहिणीला भेट दिली होती. दुसरी अंगठी त्याने श्रद्धाला दिली होती. मात्र श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने ही अंगठी काढून घेतली आणि त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला ती अंगठी भेट दिली होती. १ जून २०२२ ते ८ जून २०२२ पर्यंत श्रद्धा आणि आफताब या दोघांच्या फोनचं लोकेशन मुंबईमध्ये एकत्रच मिळालं होत. १० जून २०२२ ते १९ जून २०२२ या कालावधीत हे लोकेशन दिल्लीत मिळालं होतं.

आफताबने मागवला होता ड्राय आइस

आफताबने श्रद्धाचा मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी ११ किलो ड्राय आइस मागवला होता. हत्या केल्यानंतर पुढचे तीन पाण्याच्या १६ बाटल्या मागवल्या होत्या. जी १३ हाडं पोलिसांना मिळाली त्यातल्या एकासोबत तिच्या वडिलांचा डीएनने मॅच झाला आहे. फ्रिजमध्ये मिळालेले रक्ताचे डाग, घरातल्या बाथरूम आणि स्वयंपाक घरात मिळालेले डाग यांचा डीएनही श्रद्धाच्या वडिलांशी मॅच झाला आहे. आफताब एवढा चलाख होता की त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन दिवसांनी इंस्टाग्राम आणि फोनवर लोकांना हे सांगायला सुरूवात केली की श्रद्धा मला सोडून गेली आहे. श्रद्धाच्या मित्रांसोबत तो श्रद्धा म्हणूनच आफताब बोलत होता. त्यावर त्याने हे पण लिहिलं होतं की आफताब आणि माझं भांडण झालंय. चार्जशीटमध्ये या सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. एनडीटीव्हीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 12:55 IST
ताज्या बातम्या