१०७ दिवसांनी बांगड्या विकणाऱ्या तस्लीम अलीला जामीन; जमावाकडून मारहाणीनंतर करण्यात आली होती अटक

१०७ दिवसांच्या तुरुंगवासानंतर, जमावाने मारहाण केलेल्या इंदूरच्या बांगड्या विक्रेत्या अलीला जामीन मंजूर करण्यात आला

After 107 days in jail Indore bangle seller Tasleem Ali assaulted
तस्लीम अली, ज्याला इंदूर परिसरात बांगड्या विकत असताना ओळख लपवल्याचा आरोप करत मारहाण करण्यात आली होती

इंदौरमधील एका भागात बांगड्या विकत असताना ओळख लपवल्याच्या आरोपावरून मारहाण झालेल्या तस्लीम अलीला मंगळवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. इंदौरच्या गोविंद नगरमध्ये बांगड्या विकण्यासाठी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २४ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या तस्लीम अलीने १०७ दिवस तुरुंगात काढले.

मंगळवारी जामीन मिळाल्यानंतर इंदौरमधील बांगड्यांचा व्यापारी तस्लीम अलीचे वकील एहतेशम हाश्मी यांनी हा संविधानाचा विजय असल्याचे म्हटले आहे. “न्यायमूर्ती सुजॉय पॉल यांनी त्यांच्या आदेशपत्रात निरीक्षण केले आहे की, तस्लीमला गुंडांनी मारहाण केली आणि त्यानंतर महिलेच्या तक्रारीनंतर क्रॉस एफआयआर नोंदवण्यात आला. फिर्यादी पक्षाने जामीन प्रक्रियेला उशीर करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला. जामीन, पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते किंवा तो उत्तर प्रदशेचा असल्यामुळे पळून जाऊ शकतो असे सांगण्यात येत होते असे,” त्याच्या वकिलांनी सांगितले.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हाश्मी म्हणाले की, राज्याचे वरिष्ठ मंत्री आणि पोलिसांनी त्यांची सुटका लांबवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सर्व पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे सांगत अलीला जामीन मंजूर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये २५ वर्षीय तस्लीम अलीला काही लोकांनी मारहाण केली होती. ही घटना रक्षा बंधनच्या दिवशी घडली असल्याचे सांगण्यात येत होते. अलीवर महिलांना बांगड्या घालण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपींनी अलीला बेदम मारहाणच केली नाही तर त्याला कधीही हिंदू भागात परत न येण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अलीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या अल्पवयीन मुलीने अलीवर लैंगिक छळाचा आरोप करून हे प्रकरण आणखी मजबूत केले.

अलीवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राकेश पवार, विवेक व्यास, राजकुमार भटनागर आणि विकास मालवीय  यांच्यावर दरोडा, धार्मिक भावना दुखावणे, धर्माच्या आधारावर शत्रुत्व वाढवणे आणि दंगल घडवणे असे आरोप ठेवण्यात आले होते. चौघांना काही दिवसांत जामीन मिळाला असला तरी पीडित अलीला १०७ दिवस तुरुंगात काढावे लागले.

Video : रक्षाबंधनाच्या दिवशी बांगड्या विकणाऱ्या तरुणाला जमावाकडून मारहाण; महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप

या घटनेबद्दल बोलताना अलीने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मी खरेदीदारांना फोन करताच एका व्यक्तीने मला पकडून माझे नाव विचारले. आधी मी त्याला माझ्या मतदार ओळखपत्रावर ‘भुरा’ हे नाव सांगितले. जेव्हा त्यांनी विचारले की मी मुस्लीम आहे आणि मी हो म्हणालो, मग त्यांनी पुन्हा माझे नाव विचारले. मी तस्लीम म्हणालो. मी त्यांच्या भागात कसा येऊ शकतो असे म्हणत त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.. तेव्हा मला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की आणखी काही लोकांना घटनास्थळी बोलावले आहे. यानंतर चारही जणांनी खूप मारहाण केली. मी मुस्लिम असूनही या भागात कसा आलो आणि त्याच्या आई आणि बहिणींसोबत गैरवर्तन करत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, अलीविरुद्धच्या तक्रारीत मुलीने आरोप केला आहे की, वडील घरी नसताना दुपारी दोनच्या सुमारास तो तिच्या घरी आला होता. अर्धे जळालेले आधारकार्ड दाखवत त्याने स्वत:चे गोलू असल्याचे सांगितले. अल्पवयीन मुलीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्याच्याकडून बांगड्या विकत घ्यायला सुरुवात केली. “माझी आई पैसे घेण्यासाठी गेली तेव्हा बांगड्या विकणाऱ्याने माझ्याकडे वाईट नजरेने पाहिले आणि माझा हात धरला आणि म्हणाला, मी तुला बांगड्या घालायला मदत करेन. त्याने माझ्या गालालाही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला,” असे त्या मुलीने म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After 107 days in jail indore bangle seller tasleem ali assaulted abn

Next Story
Video : “सरकारबद्दल चांगलं लिहा, तरच जाहिराती मिळतील”, ममता बॅनर्जींनी भर कार्यक्रमात पत्रकाराला सांगितलं! व्हिडीओ व्हायरल
फोटो गॅलरी