scorecardresearch

Premium

संतापजनक: बलात्कार करून रस्त्यावर फेकलं; अल्पवयीन मुलीने अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत मागितली मदत पण…

एका १२ वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले आहेत. याबाबतचा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

minor raped half naked and bleeding viral video
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून रस्त्यावर फेकलं (फोटो-Screengrab/Viral video)

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका १२ वर्षीय मुलीवर अमानवी अत्याचार करून नराधमांनी तिला रस्त्यावर फेकलं आहे. यानंतर अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेतील पीडित मुलीने मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच तिच्या मदतीसाठी पुढे सरसावलं नाही. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या धक्कादायक घटनेनंतर पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिची गंभीर अवस्था असल्याने तिला इंदूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. वैद्यकीय तपासणीनंतर पीडित मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

48 year old man commits suicide due to wife extra marital affair
सांगली: पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीची आत्महत्या
husband arrested for doing audit work in central booking office instead of appointed woman officer in palghar
पालघरमध्ये पत्नीऐवजी पतीने केलं लेखापरीक्षण; अधिकारी असल्याचा बनाव रचणाऱ्या तोतयाला अटक
murder crime
हडपसरमध्ये पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा खून
man gets 7 years in jail for impregnating girl
नागपूर: तरुणीला गर्भवती करणाऱ्या वृद्धाला ७ वर्षांची शिक्षा

हेही वाचा- संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील उज्जैन येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसली. तिच्यावर बलात्कार करून तिला शहरातील दांडी आश्रमाजवळ फेकून देण्यात आलं होतं.

हेही वाचा- पाकिस्तान: तीन महिने बलात्कार करण्याऱ्या वडिलांचा रक्तरंजित शेवट, मुलीने थेट गोळ्या घालून केला खून

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओमध्ये ही मुलगी एका गल्लीतून फिरताना दिसत आहे. ती एका छोट्याशा कपड्याने स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान, घराबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे तिने मदत मागितली. मात्र संबंधित व्यक्तीने तिला हाकलून दिलं.

हेही वाचा- “होय, बलात्कार करण्यासाठी घरात शिरलो, पण…”, मुंबईतील एअर हॉस्टेसच्या हत्येप्रकरणी आरोपीची धक्कादायक कबुली

याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन शर्मा म्हणाले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषींची लवकरात लवकर ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना जेरबंद करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. पीडित मुलगी नेमकी कुठली आहे? याबाबत ती काहीही सांगू शकली नाही. मात्र तिच्या बोलण्यावरून ती उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After being raped 12 years old minor girl seek help half naked and bleeding video viral madhya pradesh ujjain rmm

First published on: 27-09-2023 at 14:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×