नामिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून १०० चित्ते भारतात आणण्यात येणार आहे. यासंदर्भात भारत सरकार आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. गुरुवारी पर्यावरण विभागाच्यावतीने याबाबत माहिती देण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते.
हेही वाचा >>> “मी कुठे म्हणतो माझा सल्ला ऐका,” प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले “महाविकास आघाडीला…”
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिका आणि भारत सरकार यांच्यात १०० चित्ते भारतात आणण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार दरवर्षी १० ते १२ चित्ते भारतात पाठवले जाणार आहेत. यापैकी पहिल्या १२ चित्यांची एक तुकडी १५ फ्रेब्रुवारी रोजी भारतात पोहोचेल. तसेच पाच वर्षांनी या करारातील अटींचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे. भारतातील चित्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>> ‘भारत जोडो यात्रे’ला तात्पुरती स्थगिती, राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप; ११ किमी चालणार होते, पण…
यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियापासून आठ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे या आठ चित्त्यांपैकी एका चित्त्याची प्रकृती सध्या बिघडली आहे. साशा नावाच्या या चित्त्याला किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे. सोमवारी नियमित तपासणीदरम्यान साशाला थकवा आणि अशक्तपणाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.