गेल्या वर्षभरापासून थैमान घालणाऱ्या करोनाने संपूर्ण देशात आपले हातपाय पसरले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना दिसत आहे. अगदी दुर्गम भागातही करोनाची लागण झाल्याचे पहायला मिळत आहे. केरळच्या अतिदुर्गम अशा मुरुगुला गावात करोनाची लक्षणे असणारे रुग्ण असल्याचे समजल्यावर आरोग्य कर्मचारी या गावात पोहोचले होते. मात्र या गावात जाण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनाी पायी रस्ता पार करत आपले कर्तव्य बजावले आहे. डीसीसीचे हे आरोग्य कर्मचारी जंगलातून वाट काढत त्या रुग्णांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्यावर उपचार केले. केरळ सरकारने सर्वच भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डोमिकिले केअर सेंटर (डीसीसी) सारखी योजना आणली आहे. त्याद्वारे सर्वांवर उपचार केले जात आहेत.

SOS कॉल मिळाल्यानंतर, पुथूर डोमिकिले केअर सेंटर (डीसीसी) मधील वैद्यकीय पथक पलक्कडमधील अटापडीपासून २० किमी अंतरावर असलेल्या आदिवासी भागात असलेल्या इरुला, मुडूगर आणि कुरुंबा जमातीची १०० लोकं असलेल्या गावात पोहोचले. गेल्या आठवड्यात वस्तीतील एका कुटुंबातील तीन जणांना जास्त ताप आला होता आणि त्यांना त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची गरज होती.

आरोग्य पथकातील लोक नदी ओलांडत आहेत. (एक्सप्रेस फोटो)

 

मुरुगुला गावात जाण्याचा मार्ग सोपा नव्हता. आरोग्य पथकाला आपली वाहने फक्त भवानी पुझा नदीच्या काठापर्यंत नेता आली आणि त्यानंतर पायी नदी ओलांडून जावे लागले. शनिवारी सकाळी नदी पार केल्यावर, आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी गावात पोहोचण्यासाठी अटापाडीच्या जंगलातून आठ किलोमीटरचा रस्ता पायी पार केला. तिथे पोहोचल्यावर त्यांनी ३० जणांची करोना चाचणी केली. त्यापैकी सात जणांनी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना पुथूर डीडीसीमध्ये हलविण्यात आले.

त्यानंतर या आरोग्य पथकात असणाऱ्या डॉ. सुकन्या, आरोग्य निरीक्षक सुनील वासू, कनिष्ठ आरोग्य निरीक्षक शैज आणि वाहन चालक सादेश यांचे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी फोनवरुन त्यांच्या कामाबद्दल कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

कोविडचा संसर्ग आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी केरळ सरकारने गेल्या वर्षी करोनाचा उद्रेक झाल्यापासून आरोग्य व्यवस्थेत अनेक अंतर्गत बदल केले आहेत. डीसीसी ही एक नविन संकल्पना त्यांनी आणली होती.

“प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वत:चे डीसीसी असते आणि त्याच्यावर गावातर्फे लक्ष ठेवण्यात येते. पुथुर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ६७ गावे आहेत. रुग्णालयांवरील ओझे कमी करण्यासाठी, डीसीसीसारख्या योजनांचा या भागात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आमच्याकडे पुथुर डीसीसीमध्ये सुमारे १२० बेड आहेत. या सुविधेमुळे आम्ही अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवता येत आहेत, ”असे पलक्कडचे जिल्हा पंचायत नगरसेवक राजन म्हणाले.

“केरळ सरकारची डोमिकिले केअर सेंटर पूर्ण कार्यक्षमतेने काम करत आहेत. लोकांना चाचण्या करण्यास आणि लसीकरण करण्यास ते प्रोत्साहित करत आहेत. पुथार नदी ओलांडून उपचारांसाठी आलेल्या डोमिकिले केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांच्या धैर्याचे खरोखर कौतुक आहे, असे अटापडी येथील आदिवासी भागात काम करणाऱ्या ओडियान लक्ष्मणन यांनी सांगितले.

दरम्यान, केरळमध्ये गेल्या २४ तासांत २४,१६६ नविन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १८१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.