कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या एका अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत एका बाईकला धडक दिली. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आता या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. असं असतानाच आरोपीचे वडील आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी या प्रकरणामध्ये राजकीय हेतूने जाणूनबुजून आपल्या मुलाचं नाव गोवलं जात असल्याचा आरोप केलाय.

पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाचे नेते असणाऱ्या सावदी यांनी माझ्या मुलाला म्हणजेच चिदानंद सावदीला या प्रकरणामध्ये उगाच अडकवलं जात आहे. अपघात झाला तेव्हा माझा मुलगा गाडी चालवत नव्हता असं सावदी म्हणालेत. तसेच या घटनेचा राजकीय हेतूने वापर केला जात आहे. या मागे कोण आहे याचा मी नक्की शोध घेईन, असं सावदी यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री असण्याबरोबरच सावदी हे कर्नाटकचे परिवहन मंत्री देखील आहेत. याच संदर्भात पत्रकारांनी तुमच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय का असा प्रश्नही सावदी यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना. “तो (चिदानंद) हा फॉर्चुनर कारमध्ये होता. अपघात झाला त्या ठिकाणापासून ही गाडी फार पुढे होती. दुसऱ्या गाडीने (एमजी ग्लोस्टर जी चिदानंदच्या मालकीची आहे) धडक दिल्याने हा अपघात झाला. माझ्या मुलाचं नाव एफआयआरमधून वगळण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र हे आरोप खरे नाहीत. एकदा या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली की सत्य समोर येईल,” असं सावदी म्हणालेत.

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात सोमवारी हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्ग ५० वरील हुनगुंडजवळ कुडलसंगमा क्रॉस येथे हा अपघात घडला. गाडीने एका शेतकऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातामध्ये जखमी झालेल्या या शेतकऱ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण रात्री नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव कुदालाप्पा बोली (५८) असं असून तो चिक्काहानदागल गावचा रहिवाशी होता. या प्रकरणामध्ये पोलीस तपास करत आहेत.

उपमुख्यमंत्री असणारे लक्ष्मण सावदी अशाप्रकारे एखाद्या वादामध्ये अडकण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१२ साली लक्ष्मण सावादी यांना इतर दोन आमदारांसहीत कर्नाटक विधानसभेत पॉर्न पाहताना पकडण्यात आले होते. त्यानंतर २०१९ साली कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही लक्ष्मण यांच्या खांद्यावर थेट उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलेलं.  वादग्रस्त पार्श्वभूमी असणाऱ्या सावदी यांना इतके महत्वाचे पद देण्याच्या येडुरप्पा यांच्या निर्णयावर पक्षातील काही वरिष्ठ नेतेच नाराज असल्याची चर्चाही कर्नाटकच्या राजकीय वर्तुळामध्ये होती.