पराभवाच्या धक्क्यानंतर आता भाजपचे विचारमंथन; केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला मोदी लावणार हजेरी

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करणार आहोत, असे भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

उद्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक,  समारोपाला मोदी उपस्थित राहणार

नवी दिल्ली : देशात काही लोकसभा व विधानसभांच्या पोटनिवडणुकीत पक्षाला मिळालेल्या संमिश्र यशाच्या पार्श्वभूमीवर आगामी पाच  राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून यासंदर्भात रणनीतीवर चर्चा करण्यासाठी भाजपची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था राष्ट्रीय कार्यकारिणीची रविवारी बैठक होणार आहे. दिवाळीनंतर होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

कोविड-१९ साथीच्या प्रतिबंधामुळे २०१९ नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या बैठकीत नुकत्याच सुधारलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील नेते सध्याच्या राजकीय आणि महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करतील.

कार्यक्रमपत्रिकेत आत्तापर्यंत अध्यक्षीय भाषण, शोकदर्शक ठराव, आगामी विधानसभा निवडणुका आणि इतर वर्तमान समस्यांवरील चर्चा आणि ठराव, आगामी कार्यक्रम आणि समारोपीय भाषण यांचा समावेश असला तरी, शनिवारी होणाऱ्या सरचिटणीसांच्या बैठकीत ठरावांची संख्या आणि वैशिष्ट्य निश्चित करणे अपेक्षित आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करणार आहोत, असे भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा त्यांच्या भाषणाने बैठकीला सुरुवात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणाने बैठकीची सांगता होईल.

एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ही बैठक  होईल. कोविडची परिस्थिती लक्षात घेता बैठकीला राष्ट्रीय पदाधिकारी आणि केंद्रीय मंत्री राष्ट्रीय राजधानीतील बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर राज्याचे नेते आपापल्या राजधानीतून या बैठकीत होणार आहेत, असे भाजपचे राज्यसभा सदस्य व मीडिया सेलचे राष्ट्रीय प्रमुख अनिल बलुनी यांनी सांगितले.

देशात नुकत्याच लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या एकूण ३० जागांसाठी नुकत्याच पोटनिवडणुका झाल्या.

यात भाजपला एक लोकसभेची व १५ विधानसभेच्या म्हणजे विधानसभेच्या एकूण १५ जागांवर यश आले. म्हणजे निम्म्या जागी पक्ष पराभूत झाला. ही बाब पक्षाने गांभीर्याने घेतली आहे. भाजपशासित उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा आणि काँग्रेसशासित पंजाबमध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत, तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये २०२२ नंतर मतदान होणार आहे.

बैठकीत पोटनिवडणुकीचे निकाल, भाजपची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाचा झालेला लाजिरवाणा पराभव, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांच्या हनागल विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव यासह पुढील वर्षी होणाऱ्या राज्य निवडणुकांच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: After the shock of defeat now bjp thinking central executive meeting tomorrow akp

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या