सत्तेचा तिढा : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गडकरींची भेट

सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग!

संग्रहीत

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग येत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची देखील  भेट घेतली आहे.

नितीन गडकरी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेनसह सर्वच पक्षांमधील नेत्यांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत.  सध्या दोन्ही पक्षात सत्तास्थापनेवरून जोरदार चढाओढ सुरू आहे, या पार्श्वभूमीवर गडकरी सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका निभावतात का? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील एक अनुभवी नेते म्हणून गडकरींची भेट घेतली असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेकजण बोलत आहेत. मी त्याबाबत काहीही बोलणार नाही, महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल याची खात्री बाळगा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

२४ ऑक्टोबर रोजी विधानसभेचे निवडणूक निकाल लागले. शिवसेनेला ५६ तर भाजपाला १०५ जागा मिळाल्या. या सगळ्या सत्ता समीकरणांबाबत उलटसुलट चर्चा केली जाते आहे. शिवसेनेने सत्तेत अर्धा वाटा मागितला आहे. तर मुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षे वाटून घ्या असं म्हटलं होतं. यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत अडचणी येत आहेत. महाराष्ट्राच मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सरकार स्थापनेच्याही विविध चर्चा सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे सांगत आहेत. रविवारी तर त्यांनी आमच्याकडे १७० आमदारांचं पाठबळ असल्याचंही सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: After the visit of amit shah chief minister meet gadkari msr

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या