Agra Bride 90 Lakh Demand on first wedding night investigation : प्रेमाचे प्रतिक मानला जाणरा ताजमहाल ज्या शहरात आहे, त्या आग्र्यामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहित जोडप्याने सुखी संसाराला सुरूवात करणे अपेक्षित असताना, त्या दोघांमध्ये शत्रुत्व आणि कायदेशीर लढाई पेटल्याचे पाहायला मिळले. नववधूने कथितपणे लग्नाच्या पहिल्या रात्री आपला चेहरा दाखवण्यासाठी पतीकडे चक्क ९० लाख रूपयांची मागणी केली आहे. इतकेच नाही तर ९० लाख रुपये दिल्याशिवाय पतीशी कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवण्यास या महिलेने नकार दिल्याचा आरोप आङे. उत्तर प्रदेश पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपांची चौकशी केली जात आहे.
गौरव आणि कल्पना हे दोघेही आग्रा येथील रहिवासी आहे, या दोघांचा विविह सुमारे एक वर्षापूर्वी २९ एप्रिल रोजी झाला, मात्र हे लग्न एक दिवसही टिकले नाही. गौरवची बहीण मुस्कानने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कल्पनाने तिच्या पतीबरोबर कोणतेही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, तसेच त्याचा अपमान केला.
तसेच कल्पना आणि तिच्या भावांनी, दागिने घालण्याच्या बहाण्याने स्वत:चे आणि सासूचे दागिने कथितपणे लंपास केले. याबरोबरच कल्पनाने गौरव आणि त्याच्या कुटुंबावर तिच्या वडीलांना आणि भावांना ९० लाख रुपये देण्यासाठी दबाव टाकला.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कल्पना तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली. यावेळी तीने गौरवच्या कुटुंबाला धमकी देखील दिली की “९० लाख रुपये द्या अन्यथा मरायला तयार राहा.” तेव्हापासून ती घरी परतलेली नाही. इतकेच नाही तर तिचे कुटुंबिय गौरवच्या कुटुंबाला कथितपणे जिवंत जाळण्याची धमकी देखील देत आहेत.
३ सप्टेंबर रोजी कल्पानाचा भाऊ राहुल याने मुस्कानला त्याचे बँक डिटेल्स पाठवले, आणि संबंधित रक्कम खात्यावर हस्तांतरित करण्याची मागणी केली.
त्याच्या एका महिन्यानंतर, २५ मार्च रोजी अचानक कल्पना तिच्या वडील (नरेंद्र) भाऊ (विकास आणि राहुल) आणि त्यांचे लग्न जुळवणारा व्यक्ती (मुन्ना मास्टर) हे गौरवच्या घरी आले. त्यांनी गौरवच्या कुटुंबियांना घरात कोंडले आणि शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कल्पनाच्या कुटुंबाने गौरवला जिवंत राहायचे असेल, तर ९० लाख रुपयांची व्यवस्था करण्यासाठी कथितपणे दोन तासांची मुदत दिली. गौरवचे वडील ६७ वर्षांचे उमेद सिंग यांना हृदयरोग आहे आणि तसेच त्यांची दृष्टी देखील कमजोर आहे. त्यांना अपमानित करण्यात आले आणि शिवीगाळ करण्यात आली.
आरोपींनी अपघात असल्याचे दाखवून कुटुंबाची हत्या करण्यासाठी घरात बसवलेल्या पाइप्ड नॅचरल गॅस कनेक्शनशी छेडछाड केली. मात्र पोलिसांच्या मदतीने कुटुंबाला वाचवण्यात आले.
तक्रारीत असा आरोप केला आहे की, कल्पना आणि तिचे कुटुंब वारंवार त्यांच्या घराभोवती फिरताना दिसतात आणि धमक्या देतात, तसेच भीतीचे वातावरण तयार करत आहेत. दरम्यान, लग्नात मध्यस्थी करणाऱ्या मुन्ना मास्टर याने कबुली दिली आहे की, फक्त पैसे उकळण्याच्या उद्देशाने त्याने हा लग्नाचा बनाव रचून एक जाणीवपूर्वक कट रचला होता. दरम्यान या प्रकरणाची सध्या चौकशी केली जात आहे.
