आग्रामधील ‘राजा की मंडी’ या रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (दि. २७ मे) रोजी स्थानकावर रानी आणि किशोर नावाचे लिव्ह इन पार्टनर बोलत बसले होते. दरम्यान त्यांच्या काही कारणास्तव भांडण झाले. त्यानंतर रानीने आपल्या प्रियकराला घारविण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. तिथून ती त्याच्याशी भांडत असतानाच मागून आलेल्या ट्रेनखाली ती चिरडली गेली. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही चित्रण आता समोर आले आहे.

इंडिय टुडेने दिलेल्या बातमीनुसार, लिव्ह इन पार्टनर रेल्वे स्थानकावर भांडण करत होते. प्रियकराने मद्यपान सोडावे, यासाठी प्रेयसी त्याला समज देत होती. मात्र काही क्षणात तिने ट्रॅकवर उडी घेत, मद्यपान न सोडल्यास जीव देण्याची धमकी दिली. तेवढ्यात वेगाने आलेल्या ट्रेनमुळे ती खाली चिरडली गेली.

Man Sexually Assault Dogs
रस्त्यात श्वानांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावणाऱ्या विकृताचा Video व्हायरल; लहान मुलगी अत्याचार पाहून थांबवायला गेली पण..
best buses, fleet of buses, BEST initiative, fleet of buses owned by BEST in the BEST initiative is decreasing, Best bachao Campaign, Brihanmumbai Electricity Supply and Transport Undertaking,
७५ वर्षापासूनची बेस्ट उपक्रमाची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर, बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाचवण्यासाठी ‘बेस्ट बचाओ’कडून पुढाकार
bear, Dighori mothi police station,
तक्रार करण्यासाठी अस्वल जेव्हा पोलीस ठाण्यात येते तेव्हा! पोलीस कर्मचाऱ्यांची बोबडी वळली, एकच पळापळ…
Megablack Sunday on Central Railway Mumbai print news
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक
School Bus accident
स्कूल बसचा प्रवास धोकादायक? जे. जे. उड्डाणपुलावरील ही घटना काळजाचा ठोकाच चुकवेल, २० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा VIDEO व्हायरल!
Chandigrah accident
मॉलमधील टॉय ट्रेन उलटल्याने ११ वर्षीय मुलाचा चिरडून मृत्यू, पाहा धक्कादायक घटनेचा VIDEO
Boyfriend, girlfriend,
नागपूर : प्रेयसीच्या मुलाला रेल्वेत सोडून प्रियकराचे पलायन
Navi Mumbai, Rabale Police Station, Registers Case Against Three, Attempted Murder, Dispute Over Police Complaint, crime news, navi Mumbai news,
नवी मुंबई : क्षुल्लक कारणावरून हत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल
https://www.indiatoday.in/india/story/prajwal-revanna-accused-in-sex-tapes-case-to-leave-for-india-tomorrow-pti-citing-sources-2545113-2024-05-29

सीसीटीव्ही चित्रणात दिसत असल्यानुसार, दोघेही सोमवारी राजा की मंडी स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. २ वर आले होते. संभाषण करत असताना मध्येच त्यांच्यात भांडण सुरू झाले आणि त्याचे पर्यवसन नको त्या घटनेत झाले. ट्रॅकवर उतरल्यानंतर मागून वेगात येणाऱ्या केरळ एक्सप्रेसची तिला काहीही कल्पना नव्हती. ट्रेन जवळ आल्यानंतर ती प्लॅटफॉर्मच्या नजीक आली, मात्र तिला वर येता आले नाही आणि क्षणात ती ट्रेनखाली गेली.

यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफ अधिकारी लक्ष्मण पचौरी आणि इतर शिपाई यांनी केरळ एक्सप्रेस गेल्यानंतर तात्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेतली आणि रानीला एसएन वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दुर्दैवाने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जीआरपी पोलीस प्रमुख समर बहादुर यांनी याबाबत लिव्ह इन पार्टनर किशोरचा जबाब घेतला आहे. तो म्हणाला की, रानीच्या आयुष्यात याआधी काही अप्रिय घटना घडल्या होत्या. तिचा पहिला पती धर्मेंद्र हा अति मद्यपानामुळे मृत पावला होता. मागच्या वर्षभरापासून आमचे संबंध होते.

रानीच्या वडीलांना या अपघाताची माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, पहिल्या पतीपासून तिला तीन मुले आहेत. दोन मुले तिच्याबरोबर राहायची तर मोठा मुलगा वेगळा राहतो. पोलीस निरीक्षक समर बहादुर यांनी सांगितले की, आतापर्यंत कोणतीही तक्रार याबाबत दाखल करण्यात आलेली नाही. जर तक्रार दाखल झाली तर आम्ही पुढे तपास करू.