आग्रामधील ‘राजा की मंडी’ या रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (दि. २७ मे) रोजी स्थानकावर रानी आणि किशोर नावाचे लिव्ह इन पार्टनर बोलत बसले होते. दरम्यान त्यांच्या काही कारणास्तव भांडण झाले. त्यानंतर रानीने आपल्या प्रियकराला घारविण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. तिथून ती त्याच्याशी भांडत असतानाच मागून आलेल्या ट्रेनखाली ती चिरडली गेली. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही चित्रण आता समोर आले आहे.

इंडिय टुडेने दिलेल्या बातमीनुसार, लिव्ह इन पार्टनर रेल्वे स्थानकावर भांडण करत होते. प्रियकराने मद्यपान सोडावे, यासाठी प्रेयसी त्याला समज देत होती. मात्र काही क्षणात तिने ट्रॅकवर उडी घेत, मद्यपान न सोडल्यास जीव देण्याची धमकी दिली. तेवढ्यात वेगाने आलेल्या ट्रेनमुळे ती खाली चिरडली गेली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agra woman jumps on railway track to scare live in partner mowed down by train kvg