आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व पक्ष कामाला लागले आहेत. इंडिया आघाडी आणि एनडीए अशी कडवी झुंज आगामी लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठका सुरू असून एनडीएनेही कंबर कसली आहे. परंतु, निवडणुकीच्या आधीच एनडीएला मोठा धक्का बसला आहे. तमिळनाडूतील मोठा पक्ष ऑल इंडिया द्रविड़ मुनेत्र कड़गमने एनडीएचा पाठिंबा काढून घेतला आहे.

तामिळनाडूमध्ये भाजपा आणि एआयएडीएमकेचा वाद विकोपाला गेला आहे. भाजपा नेत्यांकडून सातत्याने एआयएडीएमकेच्या नेत्यांवर टीका केली जात असल्याचा दावा एआयएडीएमकेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पक्षाची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Stone planting on leader anil deshmukh vehicle,
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक,राजकीय वर्तुळात खळबळ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना
Badnera Assembly constituency, Bachchu Kadu, uddhav Thackeray group, navneet rana
राणांविरोधात बच्‍चू कडूंची ठाकरे गटाच्‍या बंडखोर उमेदवाराला साथ ; म्‍हणाले, “नेतेच आता खतरे मे…”
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र

“तमिळनाडूतील भाजपाच्या नेते गेल्या वर्षभरापासून आमच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर सतत अनावश्यक टीका करत आहेत. त्यामुळे, आजच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला”, असं पक्षाकडून अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे.

“२ कोटी स्वयंसेवकांच्या मताचा आणि इच्छेचा आदर करून AIADMK आजपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून माघार घेत आहे, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे”, AIADMK च्या अधिकृत ट्विटर खात्यावरून असं ट्वीट करण्यात आलं आहे. AIADMKच्या प्रवक्त्या ससिरेखा म्हणाल्या की, “भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीशी संबंध तोडण्याचा ठराव पक्षातील सदस्यांच्या मतानुसार घेण्यात आला आहे. तसंच, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही उत्सुक आहोत.”

तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविडियन आयकॉन सीएन अन्नादुराई यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसंच, जे जयललिता यांच्यावरही टीका केली होती त्यानंतर, तामिळनाडूमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतरच एनडीएतून AIADMK मधून माघार घेतली आहे.