बर्थडे पार्टीत वरिष्ठ सहकाऱ्यानं एम्सच्या आवारात बलात्कार केल्याचा डॉक्टरचा आरोप

आरोपी विवाहित असून आपल्या परिवारासह तो हॉस्पिटल परिसरातल्या इमारतीतच राहतो.

Student Gang Raped Boyfriend Thrashed By Robbers Near Mysore
(प्रातिनिधीक छायाचित्र)

दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातल्या एक डॉक्टरने आपल्याच वरिष्ठावर बलात्काराचा आरोप केला आहे. रुग्णालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका बर्थडे पार्टीच्या वेळी ही घटना घडल्याचं महिला डॉक्टरने सांगितलं आहे. ही घटना २६ सप्टेंबर रोजी या महिलेच्या एका सहकाऱ्याच्या वाढदिवसादिवशी घडली.

याविषयी इंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की त्यांना या घटनेची माहिती ११ ऑक्टोबर रोजी मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडितेची भेट घेतली. तिने त्यांना सांगितलं की २६ सप्टेंबर रोजी जेव्हा ती तिच्या सहकाऱ्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी त्याच्या खोलीत गेली तेव्हा तिच्या वरिष्ठ सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला.

आरोपी विवाहित असून आपल्या परिवारासह तो हॉस्पिटल परिसरातल्या इमारतीतच राहतो. घटना घडली त्यादिवशी आरोपीच्या परिवारातले सदस्य शहराच्या बाहेर गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित असणाऱ्या इतर डॉक्टरांचीही चौकशी करण्यात आली. पीडितेने सांगितलं की, तिने आणि तिच्या इतर सहकाऱ्यांनी त्यादिवशी पार्टीत दारू पिली आणि रात्रभर ती तिथेच राहिली. त्यानंतर आरोपी बळजबरीने खोलीत शिरून त्याने तिच्यावर बलात्कार केला.

तिच्या जबाबानुसार, भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६ आणि ३७७ अंतर्गत हौझ खास पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aiims doctor alleges rape by senior colleague during birthday party case vsk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका