Asad Encounter : उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद या दोघांचेही उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी एन्काऊंटर केले आहे. यावरून देशपातळीवर उत्तर प्रदेश पोलिसांचं कौतुक केलं जातंय. मात्र, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी याप्रकरणी योगी सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. धर्माच्या नावाखाली येथे एन्काऊंटर केलं जातं, असा घणाघात त्यांनी केला. ते तेलंगणाच्या निझामाबाद येथे बोलत होते.

कुप्रसिद्ध गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद यांचे एन्काऊंट झाल्याचे वृत्त समोर येताच अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या एन्काऊंटप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करून योगी सरकारला धारेवर धरलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Patanjali
“जाहिरातींच्या आकाराएवढा माफीनामा छापला का?” रामदेव बाबांना SC ने फटकारले; न्यायमूर्ती म्हणाल्या “मायक्रोस्कोप घेऊन…”
Ramdev Baba
“आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न

हेही वाचा >> गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा एन्काउंटरमध्ये ठार, उमेश पाल हत्याकांडानंतर ४९ दिवसांनी एसटीएफला यश

काय म्हणाले ओवैसी?

“जुनैद आणि नसिरला ज्यांनी मारलं त्यांचं भाजपा एन्काऊंटर करणार आहे का? ते नक्कीच एन्काऊंटर करणार नाहीत. कारण तुम्ही धर्माच्या नावाखाली एन्काऊंटर करता”, असं ओवैसी म्हणाले. “जुनैद आणि नसीर यांच्या हत्येतील एकच आरोपी पकडला गेला, इतर नऊ आरोपी अद्यापही गायब आहेत. त्यांचं एन्काऊंटर करणार का? नाही करणार. कायदा पायदळी तुडवला जातोय. तुम्हाला संविधानाचाच एन्काऊंटर करायचा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला तुम्हाला कमजोर करायचं आहे. मग न्यायालय कशासाठी आहेत? न्यायाधीश कशासाठी आहेत? गोळ्या घालूनच न्याय द्यायचं ठरवलं असेल तर न्यायालये बंद करा. न्यायाधीश काय काम करणार. हे काम कोर्टाचं आहे. तुमचं नाही. तुम्ही आरोपींना पकडा. कोणी हत्या करत असेल तर शिक्षा द्या त्यांना. बारा, चौदा वर्षे शिक्षा द्या”, असं म्हणत ओवैसी यांनी योगी सरकारवर आगपाखड केली.

हेही वाचा >> “भाजपा नेत्यांच्या मुलींनी केलं तर ते ‘लव्ह’, इतरांनी केलं तर ‘जिहाद”; लव्ह जिहादवरून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची आगपाखड

गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा एन्काउंटरमध्ये ठार

असद आणि शूटर गुलाम मोहम्मद दोघांनी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची हत्या केली आणि दोघेही फरार झाले होते. एसटीएफचं विशेष पथक सातत्याने या दोन आरोपींचा शोध घेत होतं. ते दोघे झाशी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ठार केलं. एसटीएफचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) अनंत देव तिवारी म्हणाले, ‘आमच्या पथकाने असद आणि मकसूदला ठार केलं आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि परदेशी शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.’