आपल्या सहकाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या या अधिकाऱ्याला बलात्काराच्या आरोपाखाली बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात देशभरातून एकूण ३० हवाई दल अधिकारी कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आले होते. पीडित २९ वर्षीय महिला अधिकाऱी १० सप्टेंबरला बास्केटबॉल खेळताना जखमी झाली होती. तिचा पाय जखमी झाला होता. यामुळे झोपण्यापूर्वी तिने पेनकिलर घेतलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


महिला अधिकाऱ्याने केलेल्या आरोपानुसार, मध्यरात्री जेव्हा जाग आली तेव्हा तिच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते आणि आरोपी अधिकारी तिच्या शेजारी झोपलेला होता. यावेळी त्याच्या अंगावरही कपडे नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air force officer arrested for rape of colleague at coimbatore training college sgy
First published on: 27-09-2021 at 13:13 IST