Air India Flight Airport Accident : एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानाचा अपघात थोडक्यात टळला आहे. हैदराबादवरून निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानाचं थायलंडमधील फुकेत विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानाचं पुढील चाक अचानक निखळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
थायलंडमधील फुकेत विमानतळावर ही घटना घडल्यानंतर हे विमान एका धावपट्टीवर अडकलं. त्यामुळे फुकेत विमानतळावरील या धावपट्टीवरील उड्डाणे तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग ७३७ मॅक्स ८ हे या विमानाची ही घटना घडली.
फुकेत विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं पुढील चाक अचानक निखळलं, त्यावेळी या विमानात नेमकं किती प्रवाशी होते? याची संख्या किंवा माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, ही घटना घडल्यानंतर एअरलाईनने एक निवेदन जारी करत घटनेची माहिती दिली आहे. तसेच विमानात असलेले सर्व प्रवाशी सुखरुप असल्याचंही सांगितलं जात आहे.
एअरलाइनने ११ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं की, हैदराबादहून निघालेल्या थायलंडमधील फुकेतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानाचं पुढील व्हील अचानक निकामी झालं होतं. त्यामुळे फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे.
"We confirm that our Hyderabad-Phuket flight on 11 March experienced an issue with the nose wheel at Phuket Airport. The crew followed all standard protocols, and guests were deplaned," says Air India Express Spokesperson.
— ANI (@ANI) March 11, 2026
HARD LANDING grounds Phuket Airport & closes runway
— RT (@RT_com) March 11, 2026
Air India Express seen in a ROUGH touch down 'suffered nose wheel issue' — reports pic.twitter.com/fbTkXMxVme
“आम्ही पुष्टी करतो की ११ मार्च रोजी आमच्या हैदराबाद ते फुकेत या विमानात फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोज व्हीलशी संबंधित तांत्रिक समस्या आली होती. विमानाच्या लँडिंग गिअर सिस्टीममध्ये व्हील हा एक महत्त्वाचा भाग असतो. फ्लाइट IX ९३८ ने हैदराबादहून सकाळी ६:२० वाजता नियोजित वेळेऐवजी सकाळी ६:४२ वाजता उड्डाण केलं होतं. त्यानंतर फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:४० वाजता फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. यावेळी आमच्या कर्मचाऱ्यांनी सर्व मानक सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन केलं आणि प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आलं आहे, असं एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
