Air India Price Hike News: एअर इंडियाने इंधनावरचा सरचार्ज वाढवला आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या विमानांची तिकिटं महागणार आहे स्पष्ट आहेत. नवे दर ८ एप्रिलपासून म्हणजेच रात्री १२ वाजल्यानंतर वाढणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसतर्फे ज्या विमानांचं उड्डाण होतं त्या विमानांच्या तिकिटांचे दरही वाढणार आहेत. PTI ने हे वृत्त दिलं आहे.

८ एप्रिलपासून नवे दर होणार लागू

पीटीआयच्या वृत्तानुसार बांगलादेश, जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया येथील उड्डाणासांठी विमानाच्या तिकिट दरांमध्ये एअर इंडियाने फ्युएल चार्ज वाढवला आहे. त्यामुळे विमानचं तिकिट महागलं आहे. ८ एप्रिलपासून नवे दर लागू होतील. त्यामुळे आता एअर इंडिया किंवा एअर इंडिया एक्स्प्रेस या विमानांनी प्रवास करायचा असेल तर तुमच्या खिशाला अधिकची झळ बसणार आहे यात शंकाच नाही.

कशी होणार दरवाढ?

नवीन दर (देशांतर्गत विमान प्रवासासाठी)
० ते ५०० किमी: २९९ रु

५०१ ते १,००० किमी: ३९९ रु १,००१ ते १,५०० किमी: ५४९ रु १,५०१ ते २,००० किमी: ७४९ रु २,००० किमी पेक्षा जास्त: ८९९ रु अशी ही दरवाढ असणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरही परिणाम

एअर इंडियाने असे संकेत दिले आहेत की आंतरराष्ट्रीय मार्गांवरील इंधन अधिभारातही सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे तेथील तिकीट दरांवरही परिणाम होऊ शकतो. एकूणच, ८ एप्रिलपासून एअर इंडियाने प्रवास करणे प्रवाशांसाठी अधिक महाग होऊ शकते, कारण वाढत्या इंधन खर्चाचा थेट परिणाम भाड्यांमध्ये दिसून येत आहे.

जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ

२७ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यासाठी जेट इंधनाची सरासरी जागतिक किंमत फेब्रुवारीच्या अखेरीस असलेल्या ९९.४० रुपये प्रति बॅरलवरून वाढून १९५.१९ रुपये प्रति बॅरल झाली. ही जवळजवळ १०० टक्क्यांची प्रचंड वाढ आहे. कच्च्या तेलावर प्रक्रिया करून तयार केल्या जाणाऱ्या ‘एव्हिएशन टर्बाइन फ्युएल’च्या (ATF) किमतीत दोन प्रमुख कारणांमुळे मोठी वाढ झाली आहे: पहिले कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ आणि दुसरे कारण म्हणजे रिफायनरी मार्जिनमध्ये झालेली मोठी वाढ. एअर इंडियाने देशांतर्गत विमानप्रवासासाठी असलेली ‘एकसमान दर पद्धत’ रद्द करून, त्याऐवजी अंतरावर आधारित नवीन अधिभार रचना लागू केली आहे. जेट इंधनाच्या किमतींमध्ये होणाऱ्या कमाल वाढीवर २५% ची मर्यादा घालण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे.