Air India : एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एअर इंडियाने आता रिअल टाइम बॅगेज ट्रॅकिंग सेवा सुरू केली आहे. या माध्यमातून प्रवाशांना आपल्या बॅगा ॲपद्वारे थेट ट्रॅक करता येणार आहेत. एअर इंडियाचे प्रवासी आता त्यांच्या बॅगेला जोडलेला टॅग स्कॅन करून त्यांच्या चेक-इन बॅग ट्रेस करू शकतात. एअर इंडिया एअरलाइन्सने आता मोबाईल ॲपमध्ये हे एआय-आधारित फिचर आणलं आहे. एअर इंडियाने आपल्या ॲपमध्ये ‘AEYE Vision’ या फिचरचे वैशिष्ट्ये सादर केले असून हे फिचर प्रवासांना संबंधित माहिती देईल.

दरम्यान, अलीकडच्या काळात प्रवाशांच्या सामानाबाबत अनेक तक्रारींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं होतं. तसंच फ्लाइटने प्रवास करताना अनेकांना आपलं सामान हरवण्याची भीती वाटत होती. मात्र, आता एअर इंडियाने आणलेल्या या नव्या फिचरच्या मदतीने प्रवाशांना त्यांच्या बॅगासंदर्भातील माहिती मिळणार आहे. मग त्यामध्ये बॅग उतरवली जात आहे की नाही. बॅग पिकअपसाठी तयार आहे की नाही? यासंदर्भातील माहिती मिळू शरणार आहे.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
naom chomsky on pm narendra modi nda government
SAU Professor Resigned: मोदी सरकारवर टीकेचा फक्त संदर्भ दिला म्हणून वरीष्ठ प्राध्यापकावर कारवाई; म्हणाले, “न्यायाची कोणतीही शक्यता…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
The flight from Kathmandu to Delhi was hijacked on December 24, 1999.
IC814 Hijacking Case: पाकिस्तानला कॉल आणि ठाकरेंच्या ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याची योजना: मुंबई पोलिसांनी IC814 अपहरण प्रकरणाचा शोध नेमका घेतला कसा?
SpiceJet Flight Delayed
SpiceJet Delayed : “मी रात्रभर थरथरत कापत होते”, स्पाईसजेट विमानाला १२ तास उशीर, मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांची गैरसोय!

हेही वाचा : Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळलं, दोन पायलटसह तीन जण बेपत्ता

प्रवाशांना आपल्या तिकिटावरील कोड स्कॅन करून फ्लाइट तपशील, बोर्डिंग पास, बोर्डिंग पास किंवा बॅगेच्या टॅगबाबतची माहिती देखील मिळू शकणार आहे. इतकंच काय तर त्या फिचरच्या मदतीने खाद्यपदार्थाचा पर्यायही निवडता येणार आहे. प्रवाशांना आता त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ निवडता येणार आहेत. हे वैशिष्ट्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय-आधारित संगणक दृष्टी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. एअर इंडिया येत्या काही महिन्यांत बॅग डायमेंशन चेक, पासपोर्ट स्कॅन यांसारखी आणखी वैशिष्ट्ये आपल्या मोबाइल ॲपमध्ये जोडण्याची योजना आखत आहे.

याबाबत एअर इंडियाचे मुख्य डिजिटल आणि तंत्रज्ञान अधिकारी सत्य रामास्वामी यांनी सांगितलं की, “आधुनिक संगणक दृष्टी तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामध्ये मॅन्युअल डेटा एंट्रीची आवश्यकता कमी करून वापरकर्त्याच्या अनुभवामध्ये लक्षणीय वाढ करण्याची क्षमता आहे. ‘AEYE Vision’ ही सुविधा ग्राहक सेवा सुधारण्यासाठी आणि प्रवास प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या एअर इंडियाच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

‘AEYE Vision’ ची प्रमुख वैशिष्ट्य काय?

‘AEYE Vision’ ची वैशिष्ट्य AI आधारित संगणक दृष्टी तंत्रज्ञानाद्वाराच्या आधारावर आहेत. या फिचरच्या माध्यमातून तिकीट, बोर्डिंग पास किंवा बॅगेच्या टॅगवरील कोड स्कॅन करून प्रवासी माहिती घेऊ शकतात. तसेच या माध्यमातून प्रवासी थेट ॲपद्वारे जेवणाची प्राधान्ये ठरवू शकतात आणि निवडूही शकतात. तसेच प्रवाशी आपल्या सामानाची स्थिती तपासून पाहू शकतात. प्रवाशांनी त्यांच्या चेक-इन केलेल्या बॅगांच्या स्थितीचे निरीक्षण करू शकतात. बॅगेज ट्रॅकिंग फीचरमध्ये आता तीन फीचर्स उपलब्ध असणार आहेत.