विस्तारा, स्पाईसजेट आणि इंडिगोपाठोपाठ आता एअर इंडियाकडूनदेखील मान्सूनसाठी विशेष सवलत देण्यात येत आहे. देशांतर्गत प्रवासासाठीचे एअर इंडियाचे तिकिट मूल्य ७०६ रुपयांपासून सुरु होत आहे. यासाठी एअर इंडियाच्या ‘सावन स्पेशल’ सेलच्या अंतर्गत १७ जून ते २१ जून दरम्यान तिकिट बुकिंग करावे लागणार आहे. एअर इंडियाकडून देण्यात आलेली सलवत १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या प्रवासासाठी देण्यात आली आहे.
एअर इंडियाने ट्विटर हँडल आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘सावन स्पेशल’ सेलची माहिती दिली आहे. मान्सून सेलच्या माध्यमातून एअर इंडिया इतर हवाई वाहतूक कंपन्यांशी स्पर्धा करताना दिसत आहे. प्रवासी सावन स्पेशल योजनेअंतर्गत एअर इंडिया तिकिट बुकिंग केंद्र, संकेतस्थळ, अॅप आणि अधिकृत ट्रॅवल एजंटकडे तिकिट बुक करु शकतात, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.
#Amazing Fare starting INR 706/- only. No one can match. Fly with #AirIndia and start your own adventure. #SaavanSpecial #FlyAI pic.twitter.com/0ztAM7AA7Z
— Air India (@airindiain) June 17, 2017
एअर इंडियाच्या आधी स्पाईसजेटने ‘स्पाईसी समर सेल’ची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत विमानाचे तिकिट दर ७९९ रुपयांपासून सुरु होत होते. तर इंडिगो काही मार्गांसाठी ८९९ रुपयांमध्ये तिकिट उपलब्ध करुन देत आहे. गोएअरच्या ऑफर्सदेखील ८९९ रुपयांपासूनच सुरु होत आहेत. तर विस्ताराने ८४९ रुपयांपासून तिकीट दर निश्चित केले आहेत.
विमान कंपन्यांकडून तिकिट दरांमध्ये सवलती दिल्या जात असल्याने ऑफ सिझनमध्येही लोक प्रवास करत आहे, असे ट्रव्हल पोर्टल क्लियरट्रिपने म्हटले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एअरलाईन सर्चमध्येही २७ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.