Air India Plane Crashed in Ahmedabad : एअर इंडियाचं अहमदाबाद-लंडन एआय-१७१ हे विमान गुरुवारी (१२ जून) अहमदाबाद विमानतळानजिक दुर्घटनाग्रस्त झालं. या दुर्घटनेत २६५ जणांचा बळी केला आहे. या विमानाच्या उड्डाणास २९ मिनिटे उशीर झाला होता. या विमानाने वेळेत उड्डाण केलं असतं तर मृतांची संख्या वाढली असती असा तर्क मांडला जात आहे. कारण, या दुर्घटनेत विमानातील २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जिथे हे विमान कोसळलं त्या रहिवासी भागातील २४ जण दगावले आहेत. रहिवासी भागात ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्या इमारतीमधील काही जण ठार झाले आहेत. विमानाने वेळेत उड्डाण केलं असतं तर इमारतीमधील अनेकांचा जीव गेला असता.

एअर इंडियाचं ड्रीमलायनर विमान अहमदाबादमधील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी क्वार्टर व मेस हॉलमध्ये कोसळलं. त्यावेळी मेसमध्ये उपस्थित असलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ज्यामध्ये तीन निवासी डॉक्टर व एका डॉक्टरच्या गर्भवती पत्नीचा समावेश होता. हे चारही जण जेवणासाठी मेसमध्ये आले होते. या विमानाने नियोजित वेळेच्या २९ मिनिटे उशिराने टेक-ऑफ (उड्डाण) केलं होतं. ही दुर्घटना व्हायच्या काही वेळ आधी मेसमध्ये डॉक्टरांचा एक समूह जेवून निघून गेला होता. त्याच मेसचा हॉल विमान दुर्घटनेत उद्ध्वस्त झाला आहे. विमान उड्डाणास उशिर झाल्यामुळे डॉक्टरांचा समूह जेवून इमारतीतून बाहेर पडला होता. त्यामुळे या डॉक्टरांचे प्राण वाचले.

…तर आणखी मोठी जीवितहानी झाली असती

दुर्घटनेच्या वेळी मेसमध्ये हजर असलेले निवासी डॉक्टर आर्यन राजपूत, मानव बादू, राकेश देवरा यांचा मृत्यू झाला असून एका डॉक्टरची गर्भवती पत्नी काजल प्रदीप सोळंकी हिचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या पाच मजली इमारतीत ३०० हून अधिक डॉक्टर्स उपस्थित असतात. मात्र, दुर्घटनेच्या वेळी केवळ तीनच डॉक्टर्स तिथे होते. ती जेवणाची वेळ असती किंवा डॉक्टरांच्या ड्युटीची वेळ नसती तर तिथे अनेक डॉक्टर्स उपस्थित असते. परिणामी या दुर्घटनेत आणखी मोठी जीवितहानी झाली असती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानतळावरील नियोजनानुसार अहमदाबाद-लंडन विमान १.०९ वाजता टेक-ऑफ करणार होतं. मात्र, या विमानाच्या उड्डाणास उशीर होऊन १.३८ वाजता विमानाने टेक-ऑफ केलं. विमानाच्या उड्डाणास २९ मिनिटे उशीर झाला होता.