दिवाळीपूर्वीच राजधानी दिल्लीची हवा अत्यंत प्रदूषित झाली असून शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी, हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीमध्ये राहील, परंतु दिवाळीच्या दिवशी फटाके वाजवल्यास ती ‘तीव्र’ स्तरापर्यंत खराब होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिल्लीतील हवेची गुणवत्ता गुरुवारी ‘अत्यंत खराब’ श्रेणीच्या ‘वरच्या स्तरावर’ पोहोचणार आहे, असे दिल्लीसाठी ‘एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टम’ने जारी केलेल्या सकाळच्या वृत्तात म्हटले आहे.

शुक्रवारी हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीमध्ये राहील, परंतु दिवाळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यास ती ‘तीव्र’ स्तरापर्यंत खराब होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वायू गुणवत्ता निर्देशांक ‘अतिशय खराब’ स्तरावर आहे. ३०१ ते ४०० पर्यंतचा वायू गुणवत्ता निर्देशांक ‘अत्यंत खराब’ मानला जातो.

गुरुवारी वाऱ्याची दिशा वेगवेगळी असू शकते, तर शुक्रवारी वाऱ्याची दिशा दिल्लीच्या वायव्येकडून असण्याची शक्यता आहे आणि पिकांचे अवशेष जाळण्यामुळे शहरातील पीएम २.५ पातळीपर्यंत वाढू शकते.