सध्या देशामध्ये Reliance Jio, Airtel आणि VI या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. यामध्ये जिओ आणि एअरटेलने आपले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. एअरटेल कंपनी भारती एअरटेल आपल्या 5G इंटरनेट सेवेचा झपाट्याने विस्तार करत आहे. या स्पर्धेमध्ये कंपनीने शुक्रवारी देशातील २३५ नवीन शहरांमध्ये आपली अल्ट्रा-फास्ट ५जी सेवा Airtel 5G Plus लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

Airtel ने नवीन २३५ शहरांमध्ये 5G Plus लॉन्च केल्यानंतर आता देशभरातील ५०० शहरांमधील ग्राहकांसाठी एअरटेल ५जी नेटवर्क उपलब्ध असणार आहे. त्याच वेळी जीओला मागे टाकत देशातील ५०० शहरांमध्ये ५जी इंटरनेट सेवा सुरु करणारी पहिली टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल ही देशातील ५जी सेवा सुरु करणारी कंपनी आहे. Airtel ने हैदराबादमध्ये भारतातील पहिले लाइव्ह 5G नेटवर्क सादर केले होते. तसेच बंगळुरूमधील BOSCH सुविधेमध्ये भारतातील पहिले खाजगी 5G नेटवर्क देखील सादर केले होते.

easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  

हेही वाचा : ChatGPT ने भारतविषयी सांगितल्या ‘या’ १० गोष्टी; ज्या तुम्हालाही माहिती नसतील, जाणून घ्या

Airtel 5G Plus लॉन्च दरम्यान भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखॉन म्हणाले, ऑक्टोबर २०२२ मध्ये ५जी सेवा देणारी एअरटेल ही पहिली कंपनी होती. आजचे मेगा लॉन्च हे देशातील प्रत्येक एअरटेल ग्राहकाला अल्ट्रा-फास्ट एअरटेल 5G प्लसशी जोडण्याचे आमचे वचन आहे. आधी आम्ही ५०० शहरांमध्ये पोचलो आहोत. तसेच दररोज ३० ते ४० शहरांना जोडत आहोत.

मार्च २०२४ पर्यंत सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भाग कव्हर करण्यासाठी त्यांचे 5G रोलआउट करण्याच्या मार्गावर आहे असे कंपनीने अलीकडेच म्हटले आहे. Airtel 5G Plus सेवा उपलब्धता झपाट्याने विस्तारत राहील, देशातील सर्व शहरे आणि गावे कव्हर करेल, कारण कंपनी देशव्यापी कव्हरेजसाठी काम करत आहे. अरटेल आता जम्मूच्या वरच्या उत्तरेकडील शहरापासून कन्याकुमारीच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत प्रत्येक मोठ्या शहरात 5G सेवा देत आहे.

हेही वाचा : Jio Cricket Plan: आयपीएलआधी जिओने लॉन्च केले ‘हे’ तीन जबरदस्त प्लॅन्स, दररोज तीन जीबी डेटा आणि…

रिलायन्स जिओने तीन दिवसांपूर्वी आपली हाय स्पीड इंटरनेट सेवा Jio True 5G ४१ शहरांमध्ये लॉन्च केले आहे. जिओचे ५जी नेटवर्क सध्या देशातील ४०६ शहरांमध्ये पोहोचले आहे. तर एअरटेल ५०० शहरांमध्ये पोहोचले आहे. जिओ देखील आपली ५जी सेवा झपाट्याने वाढवत आहे. जिओने डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक गाव आणि शहर कव्हर करण्याची योजना आखली आहे.