अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या चित्रपटांमध्ये झळकत नसली तरीही ती कायमच चर्चेत असते. याचं कारण तिची वक्तव्यं किंवा तिच्या मुलाखती. ऐश्वर्या राय ही बच्चन घराण्याची सून आहे. मध्यंतरी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या ऑल इज नॉट वेलच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण ते सगळं गॉसिप होतं असंही ऐश्वर्याने सांगितलं. दरम्यान आता ऐश्वर्या राय बच्चन चर्चेत आली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडल्याने.

ऐश्वर्या राय नरेंद्र मोदींच्या पाया पडली

बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दिवंगत आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांच्या शताब्दी उत्सवात सहभागी झाली. या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्याने स्टेजवर जाताच पीएम मोदींच्या पाया पडली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ‘इथं फक्त एकच जात अन् एकच धर्म – मानवतेचा’ म्हणत पंतप्रधान मोदींसमोरच धर्माची व्याख्या सांगतली आणि सगळ्यांची मनं जिंकण्याचं काम ऐश्वर्याने आपल्या वक्तव्यातून केलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान ऐश्वर्या राय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडली आणि आशीर्वाद घेतले याची चर्चाही रंगली आहे.

ऐश्वर्या राय नेमकं तिच्या भाषणात काय म्हणाली?

“जगात फक्त एकच जात आहे ती आहे माणुसकी, जगात एकच धर्म आहे तो आहे प्रेमाचा धर्म, तर जगात एक भाषा आहे ती आहे मनांची भाषा” असं विधान ऐश्वर्या रायने केलं ज्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . तिच्या या भाषणावर अनेक जण कमेंट करत आहेत . काहींनी लिहिले आहे, द्वेष हिंसाचार आणि सांप्रदायिकतेच्या विचारसरणीत मानवताच प्रभावी आहे हे ऐश्वर्यानं बेधडकपणे सांगितलंय . तिच्या या विचारांवर पंतप्रधान मोदींनीही टाळ्या वाजवल्या आहेत.

Award Banner

ऐश्वर्या रायने नरेंद्र मोदींचे आशीर्वाद घेतल्याची चर्चा का?

ऐश्वर्या रायने स्टेजवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले यावरुन दोन चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडून ऐश्वर्या रायने बच्चन घराण्याचे संस्कार दाखवून दिले आहेत असं अनेक नेटकरी म्हणत आहेत. तसंच तिच्या या कृतीचं कौतुकही केलं जातं आहे. ऐश्वर्याने आज केलेलं भाषण पुढची १०० वर्षे लक्षात राहिल असंही काही नेटकरी म्हणत आहेत आणि तिच्या संस्कारांचंं कौतुक करत आहेत. दरम्यान दुसरी चर्चा जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या तुलनेची आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन या दोघांची राजकीय पार्श्वभूमी ही समाजवादी पक्षाची आहे. जया बच्चन या अनेकदा मोदींवर आणि भाजपावर टीकाही करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आहेत. त्यामुळे जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या भूमिका काहीशा वेगळ्या आहेत का?

नेटकऱ्यांच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट

१) मला वाटतं ऐश्वर्याने नरेंद्र मोदींच्या पाया पडून जया बच्चन यांना नाराज केलं आहे.

२) ऐश्वर्याचं बोलणं ऐकलं, मोदींच्या पाया पडलेलंही पाहिलं. आता मला जया बच्चन यांचा चेहरा बघायचा आहे.

३) ऐश्वर्याने मोदींच्या पाया पडणं म्हणजे जया बच्चन यांच्यासाठी ‘कभी गम हमेशा गम’

४) जया बच्चन यांच्या ऐवजी ऐश्वर्या रायला राज्यसभेचं तिकिट मिळणार

५) जया बच्चन यांना नक्कीच त्रास झाला असणार