गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अजित दोवल यांची तिसऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारकडून यासंदर्भातील नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहणारे अजित डोवाल हे देशातील पहिले अधिकार आहेत. यापूर्वी २०१४ आणि २०१९ साली त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार, अजित डोवाल यांना १० जूनपासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर असेपर्यंत किंवा पुढील निर्देशांपर्यंत अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील, असं या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे. याशिवाय प्रमोद कुमार मिश्रा यांनी पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

America Travel Advisory
America Travel Advisory : भारतात येणाऱ्या नागरिकांना अमेरिकेनं दिला सतर्कतेचा इशारा; म्हणे, “पूर्व भारतात जाण्यापूर्वी विचार करा”
UPSC Exam System
Pooja Khedkar प्रकरणानंतर यूपीएससीला आली जाग, परीक्षा प्रणाली सुधारणार
Indian Passport Rank
Worlds Most Powerful Passports 2024 : जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्टची यादी जाहीर, सिंगापूरचा पासपोर्ट पहिल्या स्थानी, तर भारताचा क्रमांक घसरला!
Gurpatwant Singh Pannun
Khalistani Pannun : “भारतात परत जा”, कॅनडातील हिंदू खासदाराला खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी
funny instagram reels on budget 2024
Video: “मैं हूँ टॅक्स पेअर, हुआ मेरा मोये मोये”, अर्थसंकल्पावरचे ‘हे’ भन्नाट रील्स पाहिलेत का; तुमचं ‘बजेट’ घडलं की बिघडलं?
Kanagana Ranaut in Trouble
कंगना रणौत यांची खासदारकी धोक्यात? मंडीतील निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान, न्यायमूर्तींनी नोटीसही पाठवली!
ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
parliament budget session India bloc protest against union budget alleging discrimination against states
पक्षपातावरून खडाजंगी; अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुल्लेखामुळे ‘इंडिया’ आघाडी आक्रमक
Nityanand Rai On Terrorist Attack
‘तुरुंग किंवा नरक’, काश्मीरमधल्या दहशतवाद्यांसाठी मंत्र्यानं दिले दोनच पर्याय

हेही वाचा – “मुलीची अंतर्वस्त्रे काढणे, स्वतः नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही तर..”, राजस्थान हायकोर्टाने निर्णयात सांगितले बलात्काराचे तीन टप्पे

कोण आहेत अजित डोवाल?

अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी होते. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले. अजित डोवाल यांचे गुप्तचर यंत्रणेमधील काम वाखाणण्याजोगे होते. १९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

याशिवाय १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजवली होती. यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.