Ajit Pawar shares Memory of Manmohan Singh : ‘भारतीय अर्थव्यवस्थेला उदारीकरणाची दिशा दाखवून विकासाच्या वाटेवर नेणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व’ अशा भावनांनिशी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देशातील विविध क्षेत्रांतून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून शुक्रवारी आदरांजली वाहण्यात आली. डॉ. सिंग यांच्यावर आज, शनिवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास दिल्लीतील निगमबोध घाट येथे लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंग यांच्या निधनाचा शोक म्हणून १ जानेवारीपर्यंत सर्व सरकारी कार्यालयांसह दूतावासांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे सरकारने जाहीर केले आहे. जगभरातील नेत्यांनी, अर्थ क्षेत्रातील तज्ज्ञांनी, भारतातील पुढाऱ्यांनी देखील मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या सहकाऱ्यांनी व विरोधकांनी देखील त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.

दरम्यान, अजित पवारांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीवेळी अजित पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. अजित पवार म्हणाले होते की “गोपीनाथ मुंडे यांनी देखील भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याबरोबर पाच आमदार होते. त्यामध्ये पाशा पटेल, प्रकाश शेंडगे, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे आणि अजून कोणीतरी होतं. दिल्लीत त्यांचा पक्षप्रवेश होणार होता. गोपीनाथ मुंडेंसह इतर सर्वजण काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार होते. सर्व काही ठरलं होतं. दिल्लीत नियोजन झालं होतं. मनमोहन सिंग हे त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते. काही वरिष्ठांनी पंतप्रधानांच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा मनमोहन सिंग यांनी त्या पक्ष प्रवेशाला विरोध केला. ते म्हणाले, “मी पंतप्रधान असताना लोकसभेतील भाजपाच्या (विरोधी पक्ष) उपनेत्याला अशा प्रकारे काँग्रेसमध्ये प्रवेश दिलेला मला चालणार नाही. अशा पद्धतीने विरोधी पक्ष फोडलेला मला चालणार नाही. त्यानंतर सर्वांना प्रश्न पडला की आता काय करायचं. सर्व तयारी झाली होती, नेत्यांच्या गाड्या पक्ष प्रवेशाच्या ठिकाणी आल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसचे लोक सुषमा स्वराज यांच्याकडे गेले, मग सुषमा स्वराज यांनी हे सगळं थांबवलं. त्यामुळे ते भाजपात थांबले, अन्यथा ते काँग्रेसमध्ये गेले असते”.

Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Hema Malini
“ती फार मोठी घटना नव्हती”, भाजपा खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर विधान; ३० जणांचा झाला होता मृत्यू
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

हे ही वाचा >> प्रकाश आंबेडकरांनी घेतली फडणवीसांची भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा, कोणत्या मागण्या मान्य केल्या?

शशी थरूर यांनी शेअर केली डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबतची आठवण…

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील मनमोहन सिंग यांच्याबाबत एक किस्सा एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मला कल्पना होती की डॉ. मनमोहन सिंग त्यांना दिवाळीत येणारे महागडे गिफ्ट्स आणि मिठाई परत पाठवत असत. मी त्यांना एकदा म्हणालो की हे गिफ्ट्स आणि मिठाई दिवाळीत एकमेकांना देण्याची पद्धत आहे. ते परत देणं कदाचित उद्धटपणाचं वाटू शकतं. त्यावर त्यांनी फक्त एक स्मितहास्य केलं. नंतर जेव्हा माझी त्यांची कालांतराने भेट झाली, तेव्हा त्यांनी मला सांगितलं ‘शशी, मी तुझा सल्ला ऐकला’, मला कळेचना की मी असा कोणता सल्ला माझ्या पंतप्रधानांना दिला, जो त्यांना महत्त्वाचा वाटला. ते म्हणाले की तू मला दिवाळी भेटीबाबत जे सांगितलंस ते मी ऐकलं. मी आता महागड्या भेटवस्तू परत देतो, पण मिठाई परत देत नाही. मी ती माझ्या स्टाफमध्ये वाटतो!’ हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आणखी मोठं झालं होतं”.

Story img Loader