scorecardresearch

आधी ‘फेकू’, आता ‘बेचू’; अखिलेश यादवांनी वापरलं मोदी सरकारवर टीका करण्यासाठी नवं विशेषण

अखिलेश यादव यांनी सरकारवर गरिबांचे खिसे कापून श्रीमंतांच्या तिजोऱ्या भरल्याचा आरोप केला आहे.

आधी ‘फेकू’, आता ‘बेचू’; अखिलेश यादवांनी वापरलं मोदी सरकारवर टीका करण्यासाठी नवं विशेषण

नुकतंच एअर इंडियाची सरकारने केलेली विक्री तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक प्रभागांमधल्या निर्गुंतवणुकीच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. यावरुन समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यादव यांनी सरकारला बेचू (विक्रेता) असं संबोधलं आहे.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांचं पूर्वीचं एक “फेकू” हे विशेषण विस्मरणात जात असतानाच आता ‘बेचू’ हे नवं विशेषण अखिलेश यांनी वापरलं आहे. देशातील विविध तेल कंपन्यांनी इंधनाच्या विक्रीतून तब्बल ६०० टक्के नफा कमावल्याचा दावाही अखिलेश यांनी केला आणि त्याचा हिशोब भाजपकडे मागितला.

अखिलेश यादव यांनी सरकारवर गरिबांचे खिसे कापून श्रीमंतांच्या तिजोऱ्या भरल्याचा आरोप केला आहे. आगामी निवडणुकांनंतर समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात सरकार स्थापन केले की, ते विद्यमान सरकारचे सर्व अतिरेक बंद करेल आणि समाजातील सर्व घटकांची समान काळजी घेईल, असे यादव यांनी ठामपणे सांगितले.

“ही लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे,” असे सांगून त्यांनी समाजवादी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत यादव म्हणाले, “मुख्यमंत्री बाबा युवकांना लॅपटॉप देत नाहीत कारण त्यांना ते कसे चालवायचे हे माहित नाही.”

“आझमगडच्या लोकांना माहित आहे की विकासाची कामे कोणी केली आहेत,” श्री यादव यांनी विकासावरील एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आणि गोरखपूरचे लोक भाजपचा अहंकार खाली आणतील असे ठामपणे सांगितले. सपाची रथयात्रा कुशीनगर जिल्ह्यातूनही गेली. लखीमपूर खेरी हिंसाचाराचा संदर्भ देत यादव म्हणाले, “भाजप सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे आणि त्यांना वाहनाच्या टायरखाली चिरडले आहे.”

“शेतकऱ्यांवर तीन काळे शेती कायदे लादले गेले आहेत आणि ते त्याचा विरोध करत आहेत पण भाजप सरकार ते ऐकत नाही,” अखिलेश यादव म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2021 at 15:42 IST