उत्तर प्रदेशात जागावाटपासाठी अखिलेश यादव- जयंत चौधरी भेट

चौधरी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘बढते कदम’ असे लिहून यादव यांच्यासोबतचे छायाचित्र पोस्ट केले.

लखनऊ: २०२२ साली होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांत जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांची मंगळवारी येथे भेट झाली.

राष्ट्रीय लोकदलाशी आपल्या पक्षाची युती निश्चित असून, केवळ जागावाटपाची चर्चा व्हायची आहे, असे यादव यांनी यापूर्वी म्हटले होते. या दोन्ही नेत्यांनी नंतर एकमेकांसोबतची छायाचित्रे ट्विटरवर टाकली.

चौधरी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘बढते कदम’ असे लिहून यादव यांच्यासोबतचे छायाचित्र पोस्ट केले. तर, ‘श्री. जयंत चौधरी जी के साथ बदलाव की ओर’, असे अखिलेश यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले.

या दोन्ही नेत्यांची भेट झाली व तीत जागावाटपावर चर्चा झाली, यास राष्ट्रीय लोकदलाचे प्रदेशाध्यक्ष मसूद अहमद यांनी दुजरा दिला. या निवडणुकीत रालोदला किती जागा मिळतील हे अद्याप ठरलेले नसल्याचे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akhilesh yadav jayant chaudhary meeting in lucknow for allotment of seats zws

ताज्या बातम्या