उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसं राज्यातलं राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. सर्वच राजकीय पक्षांची एकमेकांवर जोरदार टीका सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. दरम्यान अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘गर्मी निकाल देंगे’ या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “गर्मी निघेल की नाही माहीत नाही, पण समाजवादी सरकार आले तर भरती नक्कीच निघेल,” असं यादव म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा उल्लेख करत म्हटले होते की, १० मार्चनंतर त्यांचे सरकार उमेदवारांमध्ये आता दिसत असलेली गर्मी काढून टाकेल. योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले होते की, “कैराना येथील तमंचावादी पक्षाचे उमेदवार धमक्या देत आहेत, म्हणजेच अजूनही गर्मी कमी झालेली नाही! १० मार्चनंतर ही गर्मी कमी होईल…”

योगींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अखिलेश यादव आग्रा येथील रॅलीला संबोधित करताना म्हणाले, “या सरकारला शेतकरी आणि गरिबांचे हाल समजत नाहीत. आपले सरकार झाले तर ‘गर्मी निकलेंगे’ असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. ते थंड ठिकाणाहून आलेत, असं दिसतंय. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे की ‘गर्मी बाहेर पडणार नाही, पण समाजवादी सरकार आले तर भरती नक्कीच बाहेर पडेल’.

दरम्यानसपा प्रमुखांनी केंद्राच्या उडे देश का आम नागरिक (उडान) योजनेचीही खिल्ली उडवली आणि ते म्हणाले की “डिझेल आणि पेट्रोल इतके महाग झाले आहे की तरुणांना मोटरसायकल चालवता येत नाही. डॉ. बी.आर. आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. जवळपास पाच वर्षे उलटून गेली, काय विकास झाला? ‘हवाई चप्पल’ (चप्पल) घातलेले लोक ‘विमानात’ बसतील’ असे भाजपा म्हणायचे. पण डिझेल आणि पेट्रोल महाग झाल्यापासून गरीबांना ट्रॅक्टर आणि तरुणांना मोटारसायकल देखील चालवता येत नाही,” असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav replied to yogi adityanath over his garmi nikal denge statement ahead of up polls hrc
First published on: 07-02-2022 at 09:48 IST