सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील एका हॉटेलवर अल कायदाशी संबंध असलेल्या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत २० हून अधिक लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. तर डझनभर लोकं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मोगादिशू येथील हयात हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या डझनभर लोकांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शुक्रवारी सायंकाळी हयात हॉटेलवर हल्ला झाल्यानंतर, सोमालियाच्या सशस्त्र दलांनी सुमारे ३० तास अतिरेक्यांशी लढा दिला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमालियाचे आरोग्य मंत्री अली हाजी यांनी एसएनटीव्हीला सांगितलं की, “आम्ही आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याची आणि ११७ जण जखमी झाल्याची पुष्टी केली आहे.”

Israeli missiles hit site in Iran
Iran-Israel War : इस्रायलची इराणविरोधात कारवाई सुरू, न्यूक्लीअर साईट्स असलेल्या शहरात अनेक स्फोट
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
israeli air strike destroys iranian consulate in syria
सिरीयातील इराणच्या दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; किमान ६ ठार झाल्याचा युद्धविरोधी संस्थेचा दावा
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू

संबंधित मृतांची संख्या ही रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीवर अधारित आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर काही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले नव्हते, त्यावर नातेवाईकांनी परस्पर अंत्यसंस्कारही उरकल्याची शक्यता आहे, असंही अली हाजी यावेळी म्हणाले.

या हल्ल्याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी हसन यानी सांगितलं की, शुक्रवारी हॉटेलवर झालेल्या हल्ल्यानंतर सशस्र दलांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. रविवारी सकाळी अन्य एका हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. संबंधित हल्लेखोर पळून जाण्याच्या बेतात होता, त्याने सामान्य नागरिकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला असता सशस्र दलांनी त्याला कंठस्नान घातलं. हा हल्ला नेमक्या किती दहशतवाद्यांनी केला, हे अद्याप स्पष्ट नसल्याचंही हसन यांनी सांगितलं.

हेही वाचा- पुतिन यांच्या सहकाऱ्याच्या मुलीचा मोटारीतील स्फोटात मृत्यू

या हल्ल्याची जबाबदारी अल शबाब या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. ही संघटना अल कायदाशी संबंधित असून ती मागील एक दशकापासून ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमालिया, केनिया आणि इथिओपिया सरकार पाडण्यासाठी लढा देत आहे. संबंधित देशांत कट्टर इस्लामिक कायदा लागू करून आपली सत्ता स्थापन करणं, हा या दहशतवादी संघटनेचा हेतू आहे.