अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतामध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेनं गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिलाय. प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी तयार आहोत, असं या दहशतवादी संघटनेनं म्हटलंय.

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणारं वक्तव्य केल्याच्यासंदर्भातून हा इशारा देण्यात आलाय. संघटनेनं जारी केलेल्या पत्रकामध्ये ‘भगवे दहशतवादी’ असा उल्लेख करत भारतीयांनी दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये होणाऱ्या हल्ल्यासाठी तयार रहावे असा इशारा देण्यात आलाय. त्यांना ना त्यांच्या घरात आश्रय मिळणार, ना त्यांच्या सैन्य छावण्यांमध्ये असा उल्लेख करत आत्मघाती हल्ला करणार असल्याचा इशारा या संघटनेनं दिलाय.

Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
National Conference (NC) Party president Farooq Abdullah and Peoples Democratic Party (PDP) leader Mehbooba Mufti
इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार

“जे आपल्या प्रेषितांचा अपमान करतात आपण त्यांना ठार मारलं पाहिजे. जे आपल्या प्रेषितांबद्दल अपशब्द वापरतात त्यांना उडवून लावण्यासाठी आपण स्वत:बरोबरच स्वत:च्या मुलांच्या अंगावरही स्फोटके बांधून हल्ला केला पाहिजे. त्यांना यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही, कोणतीही शांतता आणि सुरक्षा त्यांना वाचवू शकणार नाही. हे प्रकरण निंदा किंवा दुःखाच्या कोणत्याही शब्दांनी शांत होणारं नाहीय,” असंही या संघटनेनं पत्रकात म्हटलंय.

या पत्रामध्ये भाजपाच्या सत्तेचा उल्लेख ‘भारतावर ताबा मिळवलेले हिंदू दहशतवादी’ असा केलाय. प्रेषितांच्या सन्मानासाठी या युद्धामध्ये सहभागी होण्याचं आवाहन या दहशतवादी संघटनेनं इतरांना करताना. या युद्धात प्राण गमावले तरी हरकत नाही असं म्हटलंय. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाच्या धोरणांच्याविरोधात भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत नुपूर यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचं पक्षाने स्पष्ट केलंय.

शर्मा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण केलेलं वक्तव्य हे भगवान शंकराचा अपमान केल्यानंतर उत्तर देताना केलेला असं म्हटलेलं. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून देशात कानपूर तसेच अन्यत्रही हिंसक घटना झाल्या. शिवाय, आखाती देशांनीही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपाने नूपुर शर्मा यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले.

नूपुर शर्मा यांच्याविरोधात मुंबई तसेच, ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी नूपुर यांना नोटीस बजावली असून २२ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. नूपुर यांच्याविरोधात पुणे व हैदराबाद शहरांमध्येही गुन्हा दाखल झाला असला तरी दिल्लीत मात्र त्यांच्या विरोधात कोणीही पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाही. उलट, नूपुर शर्मा यांनीच दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली असून आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. त्याच्या विनंतीनुसार, दिल्ली पोलिसांनी नूपुर व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात आली आहे.