अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या प्रेयसीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना, प्रौढ मुलीसोबत सहमतीने लैंगिक संबंध अनैतिक असले तरी गुन्हा नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे. हे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपी व्यक्ती आणि या प्रकरणातील सहआरोपींना जामीन देण्यास नकार दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजू नावाच्या व्यक्तीला जामीन नाकारताना सांगितले की, पीडित मुलगी जर त्याची प्रेयसी तर तिच्या सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्याचवेळी पीडित मुलगी त्याची प्रेयसी असून दोघांमध्ये सहमतीने संबंध असल्याचा आरोपीचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला.

न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी म्हणाले की, “प्रौढ मुलीसोबत संमतीने लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा नसून ते अनैतिक आहे आणि भारतीय समाजाच्या नियमांनुसार नाही.” या प्रकरणातील सहआरोपींनी प्रेयसीवर केलेल्या बलात्कारादरम्यान प्रेयसीचे संरक्षण न केल्याबद्दलही न्यायालयाने आरोपीला फटकारले. प्रियकराचे कृत्य अत्यंत लाजिरवाणे होते. जेव्हा सहआरोपी त्याच्या प्रेयसीचा त्याच्यासमोर निर्दयीपणे लैंगिक छळ करत होते, तेव्हा त्याने तिला वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. प्रेयसी असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीने आपल्या प्रेयसीला या नराधमांपासून वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कौशांबी जिल्ह्यातील अकिल सराय पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. ज्यामध्ये चार आरोपींवर आयपीसीच्या कलम ३७६-डी, ३९२, ३२३, ५०४ आणि ५०६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ५ आणि ६ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये पीडितेने तिचा प्रियकर आणि तीन जणांवर बलात्काराचा आरोप केला होता.

एफआयआरनुसार, पीडिता १९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता शिवणकाम शिकण्यासाठी एका शिलाई केंद्रात गेली होती. यावेळी तिने तिचा प्रियकर राजूशी भेटण्याचंही ठरवलं होतं. त्यानंतर शिवणकामाचे प्रशिक्षण संपल्यानंतर ११ वाजताच्या सुमारास ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी जवळच्या नदीवर पोहोचली. जिथे तिने नकार देऊनही प्रियकराने तिच्याशी संबंध ठेवले. यानंतर आणखी तीन जण तेथे पोहोचले. आधी तिच्या प्रियकराला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांनी पीडितेवर बलात्कार केला होता.  घटनेच्या दोन दिवसांनंतर २१ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.