“तुम्ही तुमचे काम का करत नाही?” मुनव्वर राणांना न्यायालयाचा सवाल; अटकेला स्थगिती देण्यास नकार

वाल्मिकी समाजाला दुखावणारे वक्तव्य केल्याबद्दल राणांविरुद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Allahabad high court denied stay arrest shayar munawwar rana Taliban

कवी मुनव्वर राणा यांना कोणत्याही समुदायावर भाष्य करण्यापासून परावृत्त करण्यास सांगत, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकीची तुलना तालिबानशी तुलना करून धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीसंदर्भात अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तालिबानची तुलना रामायण लिहिणाऱ्या महर्षी वाल्मीकी यांच्याशी केल्याने कवी मुनव्वर राणा यांच्यावर धार्मिक भावना भडकावल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने कवी मुनव्वर राणा यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे आणि त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. वाल्मिकी समाजाला दुखावणारे वक्तव्य केल्याबद्दल राणांविरुद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती सरोज यादव यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना मुनावर राणा यांना त्यांच्याकडे जे काम आहे ते फक्त तेच केले पाहिजे असा सल्ला दिला आहे.

आदेश देताना करताना न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती सरोज यादव यांच्या खंडपीठाने राणांच्या वकिलाला विचारले, “तुम्ही (राणा) असे वक्तव्य का करता? तुम्ही (राणा) तुमचे काम का करत नाही? या प्रकरणात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा करता येणार आणि अटकपूर्व जामीन याचिका दाखल करा. ”

“त्यांनी २० वर्ष अन्याय सहन केलाय, सत्ता आल्यावर आनंद होणारच”, मुनव्वर राणांनी तालिबान्यांविषयी मांडली भूमिका!

तक्रारदार पी. एल. भारती यांनी आरोप केला होती की, वाल्मीकींची तुलना तालिबानशी करून राणा यांनी भावना दुखावल्या आहेत. याबाबत हजरतगंज पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल  झाला. भारती यांनी आरोप केला आहे की, वाल्मीकींची तुलना तालिबानशी केल्याने दलितांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

काय म्हणाले होते राणा

राणा यांनी एका वाहिनीवर बोलताना असे सांगितले की, ‘‘वाल्मीकींनी रामायण लिहिले त्याआधी ते दरोडेखोर होते. त्यांच्या चारित्र्यात बदल झाला, तसेच तालिबानचे आहे, ते दहशतवादी होते पण त्यांचे चारित्र्य आता बदलले आहे. वाल्मीकी यांच्याविषयी बोलताना आपण भूतकाळाचा विचार केला पाहिजे. तुमच्या धर्मात कुणीही देव होऊ शकतो, पण वाल्मीकी हे लेखक होते, त्यांनी रामायण लिहिले, पण येथे कशाची स्पर्धा लागलेली नाही.’’  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये याच पोलीस ठाण्यात राणा यांच्या विरोधात महंमद पैगंबरांबाबतच्या व्यंगचित्राचे समर्थन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Allahabad high court denied stay arrest shayar munawwar rana taliban abn

ताज्या बातम्या