पाकिस्तानी पत्रकाराच्या मैत्रीवरून लक्ष्य केल्याने भडकले अमरिंदर सिंग; सुषमा स्वराज, सोनिया गांधींचे फोटो केले शेअर

फोटोतील प्रत्येकाचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध आहे का, असा सवाल अमरिंदर यांनी केला आहे

Amarinder Singh fired after being targeted by a Pakistani journalist
(फोटो सौजन्य : अमरिंदर सिंग/फेसबुक)

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलमसोबतच्या मैत्रीमुळे सतत विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. पाकिस्तानी पत्रकार अरुसा हिच्या कथित आयएसआय संबंधांवरून टीकेला सामोरे जाणाऱ्या अमरिंदर सिंग यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांवर फोटो बॉम्ब फेकले आहेत. पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलमसोबतच्या मैत्रीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोमवारी त्यांच्या फेसबुक पेजवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये आरुषा या देशातील आघाडीचे राजकारणी आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसोबत दिसत आहेत.

फोटोतील प्रत्येकाचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध आहे का, असा सवाल अमरिंदर यांनी केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्हिसाचे बंधन नसते तर आरुसाला पुन्हा एकदा भारतात बोलावले असते, असा दावा त्यांनी केला. पंजाब काँग्रेस अमरिंदर यांच्या अरुसासोबतच्या मैत्रीवरुन हल्ला करत असल्याची माहिती आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा यांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकार अरुसाच्या आयएसआयशी असलेल्या संबंधांची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते.

सोमवारी कॅप्टन अमरिंदर यांनी आरुसा आलम यांचे १४ फोटो त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली, ज्यात त्यांच्यासोबत सोनिया गांधी, सुषमा स्वराज, मुलायम सिंह यादव, अमर सिंह, अश्विनी कुमार, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट्ट, श्याम सरन आणि माजी लष्करी अधिकारी आहेत. जगजीत सिंग यांचाही अरोरासोबत फोटो आहे.

कॅप्टन अमरिंदर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून विरोधकांवर टीका केली आहे. मी आरुसा आलमचे अनेक फोटो विविध मान्यवरांसोबत शेअर करत आहे. मला वाटते की हे सर्व आयएसआयचे संपर्क (एजंट) देखील आहेत. असे म्हणणाऱ्यांनी बोलण्यापूर्वी विचार करावा. दुर्दैवाने सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये व्हिसावर बंदी आहे. अन्यथा मी त्यांना पुन्हा आमंत्रित केले असते. योगायोगाने, मी मार्चमध्ये ८० वर्षांचा होणार आहे आणि आरुषी आलम पुढील वर्षी ६९ वर्षांची होणार आहे, असे अमरिंदर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी अमरिंदर सिंग यांच्या माध्यम सल्लागाराने सोनिया गांधी यांचा अरुसा आलमसोबतचा फोटो शेअर केला होता. यामध्ये पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि काँग्रेस पक्षाला कॅप्शनसह टॅग केले होते.

काही दिवसांपूर्वी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर बरीच टीका केली होती. अमरिंदर सिंग आणि अरुसा आलम यांच्या मैत्रीलाही त्यांनी आयएसआयशी जोडले आहे. ते अमरिंदर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री असताना त्यांना पंजाबमध्ये कधीही धोका दिसला नाही. त्यांना आता असे का वाटते? यामागे त्याची मैत्रीण आरुसा आलम आहे का?, असे रंधावा यांनी म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amarinder singh fired after being targeted by a pakistani journalist abn

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या