अमरिंदर सिंग यांचा लवकरच नवा पक्ष

पंजाबमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत.

नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभराने अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली. शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढला तर भाजपशी युती करणार असल्याचेही अमरिंदर यांनी जाहीर केले. पंजाबमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी कॉग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल, भाजप यांच्यासह अमरिंदर यांच्या नव्या पक्षामुळे पंजाबची निवडणूक पंचरंगी होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amarinder singh new party vidhan sabha election congress akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या