Ambulance Patient Death case and Petrol Pump Manager FIR details in Marathi : खाजगी रुग्णवाहिकेला इंधन देण्यास नकार दिल्याने एका ५० वर्षीय व्यक्तीला वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले नाही. यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी पेट्रोल पंप मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कलमांतर्गत उत्तर प्रदेशमधील तेंग्राही गावातील भूषण सर्व्हिस स्टेशनचे मॅनेजर अशोक कुमार भारती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्लाय इन्स्पेक्टर इंद्रेश कुमार तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासा मॅनेजरने २२ एप्रिल रोजी रात्री ९:२० च्या सुमारास एक रुग्णवाहिका पेट्रोल संपल्यामुळे इंधनाच्या शोधात पेट्रोल पंपावर आल्याची कबुली दिली. मात्र, इंधन उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना इंधन देण्यात आले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णवाहिका कथितपणे सुमारे १५ मिनिटं पेट्रोल पंपावर थांबून होती. मात्र, रेकॉर्ड तपासले असता आढळून आले की त्या दिवशी पेट्रोल पंपावर पुरेसा साठा होता, ज्यामधअये ४५९५ लीटर मोटर स्पिरिट, ज्यामध्ये ४५९५ लिटर मोटर स्पिरीट, ४७८४ लिटर हाय-स्पीड डिझेल आणि ३४७५ लिटर प्रीमियम पेट्रोलचा समावेश होता. यावरून इंधन उपलब्ध असूनही ते दिले गेले नाही हे स्पष्ट होते, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांनी सांगितले की, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बैरियाचे उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत आढळलेल्या बाबींच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

बैरियाचे सर्कल ऑफिसर मोहम्मद फहिम कुरेशी म्हणाले की, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे आणि ते आरोपी मॅनेजरचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

यापूर्वी, जिल्हा पुरवठा अधिकारी देवमणी मिश्रा यांनी सांगितले होते की, बैरिया तहसीलच्या पांडेपूर गावातील रहिवासी छत्तू शर्मा (५०) हे २२ एप्रिलच्या रात्री गंभीर आजारी पडले होते. जेव्हा त्यांचे कुटुंब त्यांना खाजगी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात घेऊन जात होते तेव्हा वाटेतच गाडीतील इंधन संपले.

इंधनासाठी कुटुंब तेंग्राही गावाजवळील एका पेट्रोल पंप गाठला, पण पंप ऑपरेटरने तुटवडा असल्याचे कारण सांगत इंधन देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. पेट्रोलच्या अभावामुळे शर्मा यांना वेळेत रुग्णालयात नेता आले नाही आणि त्यांचा वाटेतच मृत्यू झाला, असा दावा कुटुंबाने केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजवरून ही बाब स्पष्ट झाली आहे की रुग्णवाहिका पेट्रोल पंपावर आली होती आणि त्यांनी इंधनाची मागणी केली होती. पण त्यांना इंधन देण्यात आले नाही. त्यांनी पुढे असेही सांगितले की, पंप ऑपरेटरने साठा कमी असल्याचे कारण दिले होते, परंतु तपासणीत असे दिसून आले की पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध होता.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंडियन ऑइलचे प्रतिनिधी देखील घटनास्थळाला भेट देऊन गेले आहेत आणि पेट्रोल पंपाच्या विरोधात तपासाच समोर आलेल्या बाबींच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.