अमेरिकेतील टेक्सासमध्ये चार जणांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आली आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या लोकांना टेक्सासमधील ज्यूंच्या धार्मिक स्थळावर (सिनेगॉग) ओलीस ठेवण्यात आले आहे. मात्र, नंतर एका ओलिसाची सुटका करण्यात आली. दरम्यान, ओलीस ठेवलेल्या व्यक्तीने पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दीकीच्या सुटकेची मागणी केली आहे. अफियावर अफगाणिस्तानच्या ताब्यात असताना अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आफिया सध्या टेक्सासच्या फेडरल कारागृहामध्ये बंद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओलीस ठेवणारी व्यक्ती स्वतःला आफिया सिद्दीकीचा भाऊ असल्याचे सांगत आहे. मात्र, आफियाचा भाऊ स्वत: समोर आला असून ओलीस ठेवणारी व्यक्ती आफियाचा भाऊ नसल्याचे सांगितले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना बेथ इस्रायल येथे घडली आहे. ही घटना घडली त्यावेळी सिनेगॉगमध्ये सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण फेसबुकवर सुरू होते. त्याचवेळई एक व्यक्ती बंदूक घेऊन तेथे घुसल्याचे दिसून येते. ओलिस ठेवलेल्या चार लोकांमध्ये एक रब्बी (ज्यू धर्मगुरू) देखील आहे. त्याचवेळी घटनास्थळी पोलीस आणि स्वॅट टीम देखील आहे. पोलिसांकडून ओलिस ठेवलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

दुसरीकडे, पोलिसांनी आसपासच्या रहिवाशांना बाहेर काढले आहे. याशिवाय लोकांना या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर इस्रायलही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही परिस्थितीची माहिती घेतली आहे.

एकाची सुटका

कॉलिव्हिल पोलीस विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की टेक्सासच्या सिनेगॉगमध्ये ओलिस ठेवलेल्या लोकांपैकी एकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. कॉलिव्हिल पोलीस विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की आत इतर लोक आहेत पण कोणीही जखमी झाले नाही. एफबीआय आरोपींशी बोलत आहेत.

कोण आहे आफिया सिद्दीकी?

आफिया सिद्दीकीला लेडी अल-कायदा म्हणूनही ओळखले जाते. पाकिस्तानी नागरिक आहे. २०१० मध्ये, १४ दिवसांच्या चौकशीनंतर सिद्दीकीला न्यूयॉर्कमधील फेडरल न्यायाधीशांनी ८६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. एका ज्युरीने तिला अमेरिकन नागरिक आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या हत्येचा प्रयत्न तसेच अमेरिकन अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर हल्ले केल्याबद्दल दोषी ठरवले. आफिया सिद्दीकी ही एक पाकिस्तानी शास्त्रज्ञ आहे जिने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदवी प्राप्त केली आहे आणि तिने ब्रॅंडिस विद्यापीठातून डॉक्टरेट प्राप्त केली आहे.

मात्र पाकिस्तानमध्ये, अफियाला मोठ्या प्रमाणावर नायिका म्हणून चित्रित केले जाते. तिचे कुटुंबिय आणि समर्थकांचे म्हणणे आहे की ९/११ नंतरच्या दहशतवादाविरुद्धच्या युद्धात तिच्या आईवर खोटे आरोप करण्यात आले आणि तिला बळीचा बकरा बनवण्यात आले. २०१८ मध्ये, पाकिस्तानच्या सिनेटने एकमताने सिद्दीकीचा स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला आणि तिला “राष्ट्राची कन्या” म्हणून म्हटले. त्याच वेळी, अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तो ९/११ च्या हल्ल्यातील आरोपीसह धोकादायक दहशतवादी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America 4 people held hostage texas synagogue for release of pakistani scientist aafia siddiki abn
First published on: 16-01-2022 at 08:33 IST