अमेरिकेत सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात एक ठार तर १२ जण जखमी; हल्लेखोराने स्वतःवर झाडली गोळी

गोळीबारादरम्यान एकूण १३ जणांना गोळ्या लागल्या. त्यापैकी १२ जणांना रुग्णालयात नेण्यात आले असे पोलिसांनी सांगितले आहे.

America gunman kills one Tennessee supermarket 12 wounded
मेम्फिसमधील क्रोगर सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली (फोटो: रॉयटर्स)

गुरुवारी अमेरिकेच्या टेनेसी येथील एका सुपरमार्केटवर अज्ञात बंदुकधारी व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराने स्वतःवरही गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. टेनेसीचे सर्वात मोठे शहर असलेल्या कोलिअरविलच्या मेम्फिस येथील किराणा दुकानात हा हल्ला झाला. गोळीबारादरम्यान एकूण १३ जणांना गोळ्या लागल्या. त्यापैकी १२ जणांना रुग्णालयात नेण्यात आले असे पोलिसांनी सांगितले आहे.

१२ जखमींपैकी एकावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे असे पोलीस प्रमुख डेल लेन यांनी सांगितले. गोळीबार मेम्फिसच्या पूर्वेला ५० किलोमीटरवरील उपनगरातील सुपरमार्केट क्रोगर स्टोअरमध्ये झाला. यानंतर, गोळीबाराचा आरोप असलेल्या हल्लेखोराचा मृतदेह स्टोअरच्या बाजूला सापडला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचा मृतदेह पाहिल्यानंतर असे वाटते की त्याने गुन्हा केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडली.

 घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर, दुकानाच्या कॉरिडॉरमध्ये उपस्थित आणि लपलेल्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. प्रथमदर्शनी असे दिसते की गोळीबार करणाऱ्या आरोपीने स्वतःवर गोळी झाडली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आम्हाला त्याचा मृतदेह सापडला आहे असे डेल लेन यांनी सांगितले.

लेनने सांगितले की, “गोळीबाराच्या वेळी काही लोक फ्रीझरच्या बाजूला लपले होते. तर काहींनी स्वतःला केबिनमध्ये बंद केले होते. त्यांना जे करायचे प्रशिक्षण देण्यात आले ते ते करत होते.” आरोपी आणि पीडितांची ओळख पोलिसांनी ताबडतोब जाहीर केली नाही. तेथे काय घडले ते शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण यासाठी थोडा वेळ लागणार आहे असे लेन यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: America gunman kills one tennessee supermarket 12 wounded abn