अमेरिकेने १ मार्चपासून कोविड -१९ प्रतिबंधक लसींचे किमान एक कोटी ५१ लाख डोस फेकून दिले आहेत. ही पूर्वी ज्ञात असलेल्या संख्येपेक्षा खूप मोठी संख्या असून याहून अधिक डोस फेकून दिले गेले असल्याची शक्यता आहे. लसींच्या कमतरतेचा जगभरातल्या गरीब राष्ट्रांना फटका बसत असतानाच ही बातमी आता समोर आली आहे.

याविषयी एनबीसीने दिलेल्या बातमीनुसार, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार चार राष्ट्रीय फार्मसी चेन्सने प्रत्येकी १कोटीहून अधिक डोस वाया गेल्याची नोंद केली आहे.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने जारी केलेला डेटा फार्मसी, राज्ये आणि इतर लस प्रदात्यांनी स्वत: नोंदवला आहे. हे सर्वसमावेशक नाही. काही राज्ये आणि प्रदाते यात समाविष्ट केलेले नसून त्यात डोस फेकून देण्याचे कारण स्पष्ट केलेले नाही.

हेही वाचा – लसविक्रम ; देशात दिवसभरात सव्वा कोटी नागरिकांचे लसीकरण

उपलब्ध नसलेल्या माहितीसंदर्भातल्या एका उदाहरणात,रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने सांगितले की मिशिगनमध्ये मार्चपासून फक्त १२ डोस वाया गेले आहेत, परंतु मिशिगनच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाने बुधवारी सांगितले की राज्याने डिसेंबरपासून २ लाख ५७ हजार ६७३ डोस फेकले आहेत.

देशातल्या एकूण डोसपैकी वाया गेलेल्या डोसची संख्या अत्यल्प आहे. सर्वसाधारणपणे, लसीकरण केंद्रांवर डोस वाया गेल्याची अनेक कारणे असू शकतात. फुटलेल्या कुपीपासून किंवा लसीला पातळ करण्यातली समस्या ते फ्रीजरमध्ये बिघाड होण्यापर्यंत. जेव्हा कुपीमध्ये पाहिजे त्यापेक्षा कमी डोस असतो तेव्हाही लस वाया गेल्याची नोंद होते.