सध्या जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं असून अमेरिकेला याचा सर्वाधिक फटकादेखील बसला आहे. असं असलं तरी अमेरिकेत मात्र  राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीसाठी पहिली डिबेट २९ सप्टेंबर रोजी ओहियोमध्ये पार पडणार आहे. कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सनं सोमवारी याबाबत माहिती दिली. “क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहेत,” अशी माहितीही यावेळी देण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी हेल्थ एज्युकेशन कँपसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्षे जो बायडेन यांच्यादरम्यान थेट डिबेट होणरा आहे. दोन्ही नेते १५ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये पुन्हा एकमेंकासमोर येणार आहे. तर तिसरी डिबेट २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

अमेरिकेत उप-राष्ट्राध्यक्षपदासाठी ७ ऑक्टोबर रोजी पहिली डिबेट होणार आहे. सॉल्ट लेक सिटी विद्यापीठात पार पडणाऱ्या या डिबेटमध्ये उप-राष्ट्राध्यक्ष माईक पेंस हे डेमोक्रेट्रिक पक्षाच्या उमेदवारासमोर येणार आहे. सध्या डेमोक्रेटिक पक्षाकडून आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या सर्व डिबेट ९० मिनिटांच्या असतील. तसंच या रात्री ९ ते १०.३० दरम्यान होणार आहे. या सर्व डिबेट्सचं अमेरिकेत थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

सर्वेक्षणात बायडेन यांची बाजी

आठवडाभरापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात बायडेन यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं होतं. एसीबी न्यूज/ वॉशिंग्टन यांच्या सर्वेक्षणाची माहिती १९ जुलै रोजी जारी करण्यात आली होती. यानुसार ट्रम्प यांना ४४ तर बायडेन यांना ५४ टक्के लोकांचं समर्थन असल्याचं समोर आलं होतं. सलग पाचव्या राष्ट्रीय सर्वेक्षणात बायडेन यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं होतं.

कधी होणार डिबेट

पहिली डिबेट : २९ सप्टेंबर क्विव्हलँडमध्ये

दुसरी डिबेट : १५ ऑक्टोबर मायामीमध्ये

तिसरी डिबेट : २२ ऑक्टोबर नॅशविलेमध्ये