अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर प्रथमच व्यावसायिक विमानाने काबूलमधून सुमारे २०० गैर-अफगाण लोकांना घेऊन उड्डाण केले. अफगाणिस्तानातून बाहेर पडलेल्या या लोकांमध्ये अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळे याकडे अमेरिका आणि तालिबान नेत्यांमधील समन्वयातील प्रगती म्हणून पाहिले जात आहे. तालिबानने म्हटले आहे की, परदेशी आणि अफगाणी नागरिकांना वैध प्रवास दस्तऐवजांसह देश सोडण्याची परवानगी देतील.

यापूर्वी, कतारचे विशेष दूत मुतलक बिन मजीद अल-कहतानी यांनी सांगितले होते की, या विमानात अमेरिकन आणि पाश्चिमात्य नागरिक असतील. त्यांनी याला “ऐतिहासिक दिवस” ​​म्हटले होते.

अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडलं, २० वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम; बायडेन म्हणाले, “मागील १७ दिवसांमध्ये…”

तालिबानचे अधिकारी विमानतळावर गस्त घालत आहेत. प्रवाशांच्या तपासणी दरम्यान त्यांची कागदपत्रे तपासत आहेत.  तसेच सामानाची देखील तपासणी केली जात आहे. दरम्यान, काबूल विमानतळावरुन पळून गेलेले काही अनुभवी कर्मचारी कामावर परतले आहेत.

तालिबान- अफगाणिस्तान प्रकरणावरून भारताने घेतला धडा

तालिबान आणि त्यांची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी दहशतवादविरोधी कारवायांवर तैनात सुरक्षा दलांसाठी आता एक नवीन प्रशिक्षण मॉड्यूल विकसित केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की केंद्रीय सुरक्षा आस्थापनेने या सुरक्षा दलांना नवीन पद्धतीने प्रशिक्षण देण्यास आणि त्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्यास सांगितले आहे.

याबद्दल न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानात तालिबानने वर्चस्व प्राप्त केल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या सुरक्षा दलांसाठी असलेल्या प्रशिक्षण मॉड्यूलमध्ये तालिबानशी संबंधित कोणतीही माहिती नाही. भारताने काही दिवसांपूर्वी अशी भीती व्यक्त केली होती की, अफगाणिस्तान तालिबाननंतर पश्चिमेकडील पाकिस्तानच्या सीमेवर घुसखोरी करु शकते आणि दुसरीकडे पूर्वेकडील खुली सीमा या भागात घुसखोरी होण्याची शक्यता आहे. अमेरिकी सुरक्षा दल अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर केंद्रीय सुरक्षा दलांनी ओळखलं आहे की आपल्या शेजारी देशात घडामोडी वेगाने घडत आहेत आणि भारतालाही याची जाणीव असणे आवश्यक आहे.