अमेरिकन नागरिक आता करोना प्रतिबंधक लसींचे बुस्टर शॉर्ट्स घेताना पूर्व घेतलेल्या लसीऐवजी वेगळी लस घेऊ शकतात, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी शक्य असल्यास पहिल्यांदा दोन्ही वेळेस जी लस घेतलीय तीच कायम ठेवण्यास प्राधान्य द्यावं असं मत व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी व्यक्त केलं आहे.

“तुम्ही पहिल्यांदा जी लस घेतली त्याचाच बुस्टर डोस घ्यावा असा सल्ला सामन्यपणे दिला जातो. मात्र लस उपलब्धता किंवा इतर काही खासगी कारणांमुळे दुसऱ्या कंपनीच्या लसीचा बुस्टर डोस एखाद्याला घ्यावासा वाटला तर ते तो घेऊ शकतात. आपण याला मिक्स अ‍ॅण्ड मॅच म्हणू शकतो,” असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार असणाऱ्या फौची यांनी म्हटलं आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्शियस डिसिजेसचे निर्देश असणारे डॉ. फौची यांनी सीएएनला दिलेल्या वृत्तात हे भाष्य केलं. “तुम्ही आता मिक्स अ‍ॅ ण्ड मॅच पद्धतीने लस घेऊ शकता. मात्र आधीच्याच लसीचा बुस्टर घेणं हे जास्त योग्य ठरेल,” असं फौची म्हणालेत.

अमेरिकेने गुरुवारी मॉडर्ना आणि जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनची लस घेणाऱ्यांनी बुस्टर शॉर्ट्स घ्यावेत अशी घोषणा केली आहे. मात्र बुस्टर शॉर्ट्स घेताना अमेरिकन नागरिकांना मूळ लस किंवा इतर लसीच्या पर्यायाचा विचार करता येईल. बुस्टर शॉर्ट म्हणून कुठली लस घ्यायची हे ऐच्छिक असेल असं सरकारने स्पष्ट केलं आहे. मागील आठवड्यामध्ये केवळ बुस्टर लसी घेण्यासंदर्भातील सल्ला देण्यात आलेला. मात्र त्या लसी कशापद्धतीने म्हणजेच कोणत्या कॉम्बीनेशनमध्ये घ्याव्यात हे सांगण्यात आलेलं नव्हतं.

काही वैज्ञानिकांनी बुस्टर डोस हे रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवण्यासाठी गरजेचे असल्याचं त्यातही डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर महत्वाचे असल्याचे म्हटलं आहे. पूर्णपणे लसीकरण झालेल्यांना आता बुस्टर शॉर्ट घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.