मानवता जिंकली! उघड्यावर नमाज पठणाविरोधात आंदोलन सुरू असतानाच हिंदू व्यक्तीने दुकानात दिली जागा

ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे, तिथेच या व्यक्तीचं दुकानही आहे.

namaz-protest
गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावर नमाज पठण करण्याविरोधात आंदोलन सुरू आहे.

गुरुग्राममधील काही रहिवासी आणि उजव्या विचारसरणीच्या गटांचं उघड्यावर नमाज पढण्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असतानाच अक्षय यादव या ४० वर्षीय व्यक्तीने सेक्टर १२ मधील आपले रिकामे दुकान मुस्लिम समुदायातील लोकांना देऊ केले आहे जेणेकरून ते तेथे प्रार्थना करू शकतील. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या शुक्रवारी आवारात किमान १५ लोकांनी प्रार्थना केली होती आणि ते भविष्यातही अशाच प्रकारची भूमिका घेऊ इच्छितात.

त्याच दिवशी, १२ नोव्हेंबर रोजी उजव्या विचारसरणीच्या संघटनेने सेक्टर १२A मधील पूर्वी मान्य केलेल्या नमाज पढण्याच्या जागी तळ ठोकला होता. त्यांनी सांगितले की ते तेथे व्हॉलीबॉल कोर्ट बनवतील, तर सरहौलमध्ये, ८० हून अधिक आंदोलकांनी एका उद्यानावर कब्जा करून प्रार्थनेमध्ये अडथळा निर्माण केला होता.

सेक्टर १२ परिसरात, जिथे यादव यांचे दुकान आहे तिथे गेल्या आठवड्यात काही स्थानिक रहिवासी आणि संयुक्त हिंदू संघर्ष समितीच्या सदस्यांकडून उघड्यावर नमाज पठण करण्याचा निषेध नोंदवला गेला होता. त्यांनी नमाजच्या ठिकाणी नुकतीच गोवर्धन पूजेचे आयोजन केले होते.
यादव म्हणाले की, शुक्रवारच्या नमाज विस्कळीत झाल्याबद्दल ते वर्तमानपत्रात वाचत होते आणि त्यांच्या एका भाडेकरू, तौफिक अहमद यांच्याशी या विषयावर चर्चा केली. ते म्हणाले, “मी त्याला सांगितले की माझ्या घराजवळ माझे एक रिकामे दुकान आहे जे प्रार्थनेसाठी वापरले जाऊ शकते. या भागातील मुस्लीम समाजातील बरेच लोक ऑटो मार्केट आणि जवळपासच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये काम करतात. मी फक्त समुदायांमध्ये शांतता आणि सौहार्दाची आशा करतो. संविधान म्हणते की प्रत्येक नागरिकाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे आणि त्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amid namaz row man offers shop for prayers in gurgaon vsk